प. रेल्वेच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा

By Admin | Updated: November 21, 2014 01:10 IST2014-11-21T01:10:10+5:302014-11-21T01:10:10+5:30

मध्य रेल्वे मार्गावर नुकतेच नवे वेळापत्रक लागू झालेले असतानाच पश्चिम रेल्वेवर नवे वेळापत्रक लागू झालेले नाही.

Par. Waiting for railway schedules | प. रेल्वेच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा

प. रेल्वेच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर नुकतेच नवे वेळापत्रक लागू झालेले असतानाच पश्चिम रेल्वेवर नवे वेळापत्रक लागू झालेले नाही. पश्चिम रेल्वेवर नवे वेळापत्रक लागू होण्यासाठी प्रवाशांना प्रतिक्षाच करावी लागणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावर १५ नोव्हेंबरपासून नवे वेळापत्रक लागू झाले. यामध्ये जवळच्या फेऱ्यांचा विस्तार करण्यात आला असून प्रवाशांना दिलासा दिलेला आहे. साधारण दिड वर्षापूर्वी मध्य रेल्वेवर नवे वेळापत्रक लागू झाले होते. पश्चिम रेल्वे मार्गावर मात्र अजूनही नविन वेळापत्रकाचा निर्णय झालेला नाही. पश्चिम रेल्वे मार्गावर २0१३ च्या एप्रिल महिन्यात नविन वेळापत्रक लागू झाले होते. यामध्ये काही नविन फेऱ्या देण्यात आल्या होत्या. आता दीड वर्ष उलटले तरी नविन वेळापत्रकाबाबत पश्चिम रेल्वेकडून विचार करण्यात आला नसल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.

Web Title: Par. Waiting for railway schedules