Join us  

"हे खरंच सरकार नाही CIRCUS आहे", नितेश राणेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 11:24 AM

पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये राजकीय वाद असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

मुंबई - मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी 10 पोलीस उपायुक्तांच्या केलेल्या अंतर्गत बदल्यांना राज्य शासनाने रविवारी स्थगिती दिली आहे. यामुळे पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये राजकीय वाद असल्याची चर्चा होऊ लागली आहे. या निर्णयामुळे पोलीस आयुक्तांना मात्र झटका बसला आहे. यानंतर आता महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याची चर्चा देखील रंगू लागली आहे. याच दरम्यान भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

"नगरविकास मंत्रालयातील बदल्या नव्हे तर फेरफार (आघाडी सरकारच्या भाषेत) मंत्र्यांच्या संमतीशिवाय?? DCP च्या बदल्या झाल्यावर गृहमंत्र्यांना कळते?? मात्र काँग्रेसचे महसूल आणि PWD मंत्र्यांना बदल्या करण्यास मनाई?? हे खरंच सरकार नाही CIRCUS आहे!!" असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

नितेश राणे यांनी याआधीही ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. या सरकारवर कोण विश्वास ठेवणार, एका महिलेचा पहिला रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो. त्यानंतर मग एका तासात हा रिपोर्ट निगेटिव्ह होतो, हा चमत्कार सिंधुदुर्गात होतो, असे सांगत नितेश राणे यांनी सवाल उपस्थित केला होता. तसेच खारेपाटण सीमा सिंधुदुर्ग ओलांडताना लोकांकडून स्टॅम्पवर असेच घडत आहे! देवगडच्या 'या' मुलीला शिक्का मिळाला आणि तिचा हात असा झाला! महासरकार फक्त आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत आहे !! फेड अप !!, असं म्हणत नितेश राणेंनी टीकास्त्र सोडलं होतं. त्यानंतर आता ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पदभार स्वीकारताच माजी पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी केलेल्या बदल्यांना स्थगिती दिली होती. आता या स्थगितीमुळे राज्य शासनाने मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना हा मोठा झटका दिल्याचे बोलले जात आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून बदली झालेल्या या अधिकाऱ्यांनी लगेचच पदभार स्वीकारला. त्यांचे फोटोही ट्विटरवर झळकले. सर्व काही आलबेल असताना, रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालयातून या बदल्यांना स्थगिती दिल्याचे आदेश जारी करण्यात आले. देशमुख यांनी स्वत: याबाबत ट्विटरवरून माहिती दिली.

महत्त्वाच्या बातम्या

"भविष्यात अपयशाच्या केस स्टडीमध्ये कोरोना, GST आणि नोटबंदी शिकवलं जाईल"

भाजपाच्या 'या' नेत्याला मिळणार प्रियंका गांधींचा बंगला; 'हे' आहे कारण

CoronaVirus News : बापरे! वाढदिवसाची पार्टी देणाऱ्या ज्वेलरचा कोरोनाने मृत्यू, 100 जणांचा जीव धोक्यात

CoronaVirus News : परीक्षा पडली महागात; तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

CoronaVirus News : भारत बायोटेकच्या उपाध्यक्षांनी घेतला 'मेक इन इंडिया' Covaxin चा पहिला डोस?, जाणून घ्या सत्य

टॅग्स :नीतेश राणे उद्धव ठाकरेसरकारशिवसेनाभाजपाकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसपोलिसबदली