बिहारच्या पाटण्यात राष्ट्रवादीचे अधिवेशन

By Admin | Updated: June 9, 2015 18:05 IST2015-06-09T18:01:47+5:302015-06-09T18:05:49+5:30

बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिवेशन पाटणा येथे घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

NCP's session in Bihar's Patna | बिहारच्या पाटण्यात राष्ट्रवादीचे अधिवेशन

बिहारच्या पाटण्यात राष्ट्रवादीचे अधिवेशन

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ०९ - बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिवेशन पाटणा येथे घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.  
बिहारमधील राजकारणाला एक वेगऴे वळण देण्याची ताकद येथील जनतेत असून विधानसभा निवडणुकीत जनता परिवारसोबत जायला तयार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. मात्र त्यांनी  कॉंग्रेसविषयी टिप्पणी करण्याचे टाळले. आज संध्याकाळी साडे आठच्या सुमारास मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
दरम्यान, यावेळी पत्रकारांनी छगन भुजबळ यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्हाविषयी विचारले असता, त्यांनी भुजबळांची पाठराखण करत न्यायालयीन चौकशीत सत्य बाहेर येईलच, तसेच राजकीय षडयंत्रही कळेल असे सांगितले.  

Web Title: NCP's session in Bihar's Patna