Mumbai Local Update: कसाऱ्यातील पॉवर ब्लॉकमुळे लोकल सेवेला बसणार फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 14:13 IST2026-05-12T14:11:35+5:302026-05-12T14:13:32+5:30

पूर्वतयारीसाठी कसारा (इगतपुरी-खर्डी सेक्शन) येथे विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकचा मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही.

Mumbai Local Update: Local services will be affected due to power block in Kasara. | Mumbai Local Update: कसाऱ्यातील पॉवर ब्लॉकमुळे लोकल सेवेला बसणार फटका 

Mumbai Local Update: कसाऱ्यातील पॉवर ब्लॉकमुळे लोकल सेवेला बसणार फटका 

मुंबई : मध्य रेल्वेतर्फे ओव्हरहेड इक्विपमेंट कामासाठी अडथळा दूर करण्याच्या पूर्वतयारीसाठी कसारा (इगतपुरी-खर्डी सेक्शन) येथे विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकचा मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, लोकल सेवेला याचा फटका बसणार आहे.

१२ व १३ मे रोजी १५:५० ते १७:५० वाजेपर्यंत रोज २ तासांचा ब्लॉक असेल, तर  १४ ते १६ मे रोजी मध्यरात्री ३ ते ५ ब्लॉक असणार आहे. इगतपुरी - कसारा विभागातील दोन्ही लाइन्सवर हा ब्लॉक घेतला जाईल. 

ब्लॉकवरील कालावधीत या मार्गावर उपनगरीय सेवा धावणार नाहीत. १२ मे आणि १३ मे रोजी सीएसएमटी येथून १३:१०, १४:१७ आणि १४:४६ वाजता सुटणाऱ्या कसारा लोकल आसनगावपर्यंत धावतील. 

कसारा - सीएसएमटी लोकल आसनगाव येथून सुटतील. यात कसारा येथून १५:३५ वा. सुटणारी ट्रेन आसनगाव येथून १६:१२ वा. सुटेल. कसारा येथून १६:१६ वाजता सुटणारी गाडी आसनगाव येथून १६:५४ वाजता सुटेल. कसारा येथून १७:०२ वा. सुटणारी ट्रेन आसनगाव येथून १७:३९ वाजता सुटणार आहे.

Web Title : मुंबई लोकल प्रभावित: कसारा में पावर ब्लॉक से सेवाएं बाधित

Web Summary : मध्य रेलवे के कसारा में 12-16 मई तक पावर ब्लॉक से लोकल ट्रेन सेवाएं प्रभावित होंगी। कई कसारा जाने वाली लोकल ट्रेनें आसनगाँव पर समाप्त होंगी, और वापसी यात्राएँ वहीं से शुरू होंगी। एक्सप्रेस ट्रेनें अप्रभावित रहेंगी।

Web Title : Mumbai Local Affected: Power Block in Kasara Disrupts Services

Web Summary : Central Railway's power block in Kasara from May 12-16 will impact local train services. Several Kasara-bound locals will terminate at Asangaon, with corresponding return trips originating from there. Express trains remain unaffected.