मालाड पोलीस ठाण्यासमोर आंदोलन

By Admin | Updated: May 30, 2015 00:26 IST2015-05-30T00:26:10+5:302015-05-30T00:26:10+5:30

मालाडमधील श्रीनाथजी विकासकाविरुद्ध तक्रार दाखल करून घेण्यात यावी, यासाठी मुंबई विभागीय काँग्रेस समितीतर्फे शुक्रवारी मालाड पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले.

Movement in front of Malad police station | मालाड पोलीस ठाण्यासमोर आंदोलन

मालाड पोलीस ठाण्यासमोर आंदोलन

मुंबई : ‘मराठी माणसाला घर विकत नाही...’ अशी दर्पोक्ती करणाऱ्या मालाडमधील श्रीनाथजी विकासकाविरुद्ध तक्रार दाखल करून घेण्यात यावी, यासाठी मुंबई विभागीय काँग्रेस समितीतर्फे शुक्रवारी मालाड पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले.
गोरेगाव येथील रहिवासी वैभव रहाटे यांनी बहिणीसाठी श्रीनाथजी विकासकाच्या कार्यालयात जाऊन घर विकत घेण्याची तयारी दर्शविली होती. मात्र त्या वेळी हा विकासक मराठी माणसाला घर विकत नाही, अशी दर्पोक्ती कार्यालयाकडून करण्यात आली. परिणामी रहाटे यांनी मालाड पोलीस ठाण्याशी संपर्क केला. मात्र पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची नोंद घेतली नाही. यावर तक्रारकर्त्याने काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कानावर ही बाब घातली. निरुपम यांनी मालाड पोलीस ठाण्याशी संपर्क साधून हे प्रकरण तडीस नेण्याची विनंतीही केली. परंतु पोलिसांनी सहकार्य केले नाही. त्यामुळे शुक्रवारी दुपारी १ वाजता संजय निरुपम, आमदार अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मालाड पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. आंदोलनादरम्यान संबंधित परिमंडळाचे पोलीस आयुक्त विक्रम देशमाने यांनी आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. शिवाय या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि गुन्हा नोंदविण्यात यावा, असे आदेश दिल्याचे निरुपम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

च्मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, आ. अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मालाड पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले.

Web Title: Movement in front of Malad police station