Pooja Chavan Suicide Case: 'पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत अनेक गोष्टी समोर येत आहे, पण...'; धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

By मुकेश चव्हाण | Published: February 15, 2021 04:02 PM2021-02-15T16:02:37+5:302021-02-15T16:04:43+5:30

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आता मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

Minister Dhananjay Munde has also reacted to the Pooja Chavan suicide case | Pooja Chavan Suicide Case: 'पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत अनेक गोष्टी समोर येत आहे, पण...'; धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

Pooja Chavan Suicide Case: 'पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत अनेक गोष्टी समोर येत आहे, पण...'; धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

googlenewsNext

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरूण राठोड या तरूणाचं नाव प्रखरतेने समोर येत आहे. पूजा चव्हाण आत्महत्येनंतर अनेक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे, यात शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यासोबत असलेल्या कथित प्रेमसंबंधावरून पूजाने आत्महत्या केली असा आरोप भाजपाकडून केला जात आहे,  यासाठी पुरावा म्हणून देण्यात येत असलेला ऑडिओ क्लिपमधील तो आवाज कोणाचा आहे याचा तपास सुरू आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आता मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पूजा चव्हाणची हत्या नाही, तर पूर्णपणे आत्महत्याच आहे. तसेच या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत आहे. पण या आत्महत्याप्रकरणी चौकशी देखील सुरु आहे. त्यामुळे चौकशीनंतर यावर अधिक बोलता येईल, असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. 

तत्पूर्वी, पूजाच्या आत्महत्येसंदर्भात ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत, त्यातील आवाज पूजाचा नाही. पूजाच्या मृत्यूप्रकरणी आपली कोणाविरोधातही तक्रार नाही, कुणाविषयी शंका नाही. त्यामुळे आमची आणि समाजाची बदनामी करून आम्हाला वेदना देऊ नका, अशी विनंती लहू चव्हाण यांनी केली आहे. या प्रकरणात ज्यांचे नाव जोडले जात आहे, ते मंत्री संजय राठोड हे पूजाच्या वडिलांसारखे आहेत, असे लहू चव्हाण ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले आहेत.

संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी केली जाईल- गृहमंत्री

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील आता पूजा चव्हाण प्रकरणावर भाष्य केलं आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन चौकशी करण्याची मागणी भाजपाकडून होत आहे. मात्र संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी केली जाईल. चौकशीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार त्याबाबतचा निर्णय घेईल, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच पोलिसांवर दबाव असलेला विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. त्यात काहीच तथ्य नाही. पोलीस चांगला तपास करत आहेत.

मोबाईललॅपटॉपमध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी

आत्महत्या केलेल्या मुलीच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह माहिती सापडली आहे. पोलिसांनी तिचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. त्यामध्ये काय आहे हे पोलिसांनी जाहीर करावे, नाहीतर दोन-तीन दिवसांत याची माहिती बाहेर येईलच, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

कोण आहे पूजा चव्हाण?

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.

Web Title: Minister Dhananjay Munde has also reacted to the Pooja Chavan suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.