मुख्यमंत्र्यांसोबत गिरणी कामगारांची होणार चर्चा

By Admin | Updated: November 6, 2015 02:25 IST2015-11-06T02:25:35+5:302015-11-06T02:25:35+5:30

गिरणी कामगारांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी गिरणी कामगार नेत्यांना मुख्यमंत्री वेळ देत नसल्याने कामगारांनी सरकारच्या वर्षपूर्तीदिनी काळे झेंडे फडकावत

The mill workers will be discussing with the Chief Minister | मुख्यमंत्र्यांसोबत गिरणी कामगारांची होणार चर्चा

मुख्यमंत्र्यांसोबत गिरणी कामगारांची होणार चर्चा

मुंबई : गिरणी कामगारांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी गिरणी कामगार नेत्यांना मुख्यमंत्री वेळ देत नसल्याने कामगारांनी सरकारच्या वर्षपूर्तीदिनी काळे झेंडे फडकावत आंदोलन केले होते. सरकारचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी गिरणी कामगार नेत्यांनी भाजपाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेतली. दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिल्याचे गिरणी कामगार नेते प्रवीण घाग यांनी यांनी सांगितले.

Web Title: The mill workers will be discussing with the Chief Minister