मुंबईचा महापौर हिंदू मराठी असेल, ठाकरे बंधुंनी कामाता अडथळा आणू नये: अमृता फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 05:51 IST2026-01-18T05:50:51+5:302026-01-18T05:51:35+5:30

ठाणे : मुंबईचा महापौर हिंदू मराठी असेल असे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी शनिवारी ठाण्यात केले. भाजपला भरभरून मतदान करून ...

mayor of Mumbai will be a Hindu Marathi says Amruta Fadnavis | मुंबईचा महापौर हिंदू मराठी असेल, ठाकरे बंधुंनी कामाता अडथळा आणू नये: अमृता फडणवीस

मुंबईचा महापौर हिंदू मराठी असेल, ठाकरे बंधुंनी कामाता अडथळा आणू नये: अमृता फडणवीस

ठाणे : मुंबईचा महापौर हिंदू मराठी असेल असे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी शनिवारी ठाण्यात केले. भाजपला भरभरून मतदान करून प्रगतीचे राजकारण जनतेने स्वीकारले आहे. जात, प्रांतावरून लोकांची विभागणी करणाऱ्या पक्षांना जनतेने व्होटआऊट केले आहे. आता खूप मोठी जबाबदारी महायुतीकडे आल्याचे त्या म्हणाल्या. 

जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ, श्रीक्षेत्र नाणीजधाम पीठाचे पीठाधीश्वर रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या आगमनानिमित्त स्वागत समारंभ झाला. कच्चे बंधारे संकल्पपूर्ती सोहळ्याला फडणवीस उपस्थित होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले. त्या म्हणाल्या की, सामान्य माणसाचे जीवन सुखद व्हावे यासाठी महायुती काम करणार आहे. ठाकरे बंधू हे विरोधात असतील तर त्यांनी लोककल्याणाच्या कामात अडथळे आणू नये, असेही त्या म्हणाल्या.

Web Title : मुंबई के महापौर हिंदू मराठी होने चाहिए; ठाकरे बंधु बाधा न डालें: फडणवीस

Web Summary : अमृता फडणवीस ने ठाणे में कहा कि मुंबई के महापौर हिंदू मराठी होने चाहिए। उन्होंने ठाकरे बंधुओं से आग्रह किया कि यदि वे विपक्ष में हैं तो सार्वजनिक कल्याण कार्यों में बाधा न डालें, और नागरिकों के जीवन को बेहतर बनाने के लिए महायुति की प्रतिबद्धता पर जोर दिया।

Web Title : Mumbai Mayor should be Hindu Marathi; Thackeray brothers shouldn't obstruct: Fadnavis

Web Summary : Amruta Fadnavis stated in Thane that Mumbai's mayor should be a Hindu Marathi. She urged the Thackeray brothers not to obstruct public welfare works if in opposition, emphasizing the Mahayuti's commitment to improving citizens' lives.