महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गणित चुकले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 02:30 AM2019-10-25T02:30:53+5:302019-10-25T06:08:38+5:30

Maharashtra Election 2019:रणनीती न आखल्याचा झाला तोटा

Maharashtra Election 2019 :The Congress and the Nationalist Congresses party missed the maths | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गणित चुकले

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गणित चुकले

Next

- नितीन जगताप 

मुंबई : चेंबूर विधानसभा मतदार संघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि रिपाइंची एकत्रित मते ही शिवसेना भाजपच्या एकत्रित मतांपेक्षा जास्त होती. हा फरक ३०५०० मतांचा होता. यामध्ये वंचितला जर १० ते १५ हजार मते पडली. शिवसेनेच्या मतांमध्ये पाच ते दहा हजार मतांची वाढ झाली. तरी आपल्याला विजय मिळेल अशी काँग्रेसचे गणित होते. पण हे गणित चुकल्याने काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला.

२०१४ ला सर्व पक्ष स्वबळावर लढले होते. चेंबूरमध्ये प्रकाश फातर्फेकर यांना ४७४१० मते मिळाली होती तर काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना ३७३८३ मते मिळाली होती. भाजप रिपाइं युतीचे दीपक निकाळजे ३६६१५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र पवार ३९३३ यांना मते मिळाली होती. फातर्फेकर यांनी हंडोरे यांचा १००२७ मतांनी पराभव केला होता.

यंदा निकाळजे यांना भाजपने उमेदवारी न दिल्याने ते नाराज होते. त्यांनी हंडोरे यांना पाठिंबा दिला आहे असा दावा काँग्रेसकडून करण्यात येत होता. हंडोरे , निकाळजे आणि पवार या तिघांच्या मतांची बेरीज ७८ हजार होत होती. त्यामुळे शिवसेनेला ५० हजार मते मिळाली, वंचितला १५ हजार मते मिळाली. तसेच मनसेही काही मतांचे खिंडार पाडेल. त्यामुळे १० ते १५ हजार मतांनी विजय मिळेल असे काँग्रेसला वाटत होते. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची मते ३८३१६ होती. तर निकाळजे यांना मिळालेल्या मतांमध्ये भाजपाचाही वाटा होता. याचा विचार करून रणनीती न आखल्याने काँग्रेसचे नुकसान झाले.

गटबाजीचा बसला फटका

कुर्ला विधानसभेत नवाब मलिक आणि मिलिंद कांबळे असे दोन गट पडले होते. यामध्ये मलिक गटाला उमेदवारी न मिळाल्याने हा गट नाराज होता. त्याचा फटका मिलिंद कांबळे यांना बसला. . तर कलिना विधानसभेत माजी नगरसेवक जॉर्ज अब्राहम , ब्रायन मिरांडा,नगरसेवक रफिक शेख इच्छुक होते. कॉग्रेसकडून अब्राहम यांना उमेदवारी मिळाल्याने मिरांडा ,शेख नाराज झाले. शेख यांनी मुलाच्या नावाने अपक्ष अर्ज भरला तर मिरांडा यांनी अब्राहम यांना सहकार्य केले नाही. त्यामुळे अब्राहम यांचा पराभव झाला.

Web Title: Maharashtra Election 2019 :The Congress and the Nationalist Congresses party missed the maths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.