नालासोपाऱ्यात सुनेकडून सासूची हत्या

By Admin | Updated: May 30, 2015 22:36 IST2015-05-30T22:36:55+5:302015-05-30T22:36:55+5:30

सासू - सुनेच्या भांडणाच्या कथा काही नव्या नाहीत. सासू नेहमीच सुनेचा छळ करते. पण नालासोपाऱ्यातील घटनेत सुनेने सासूची हत्या केली.

List of Sunni killings in the cavity | नालासोपाऱ्यात सुनेकडून सासूची हत्या

नालासोपाऱ्यात सुनेकडून सासूची हत्या

पारोळ : सासू - सुनेच्या भांडणाच्या कथा काही नव्या नाहीत. सासू नेहमीच सुनेचा छळ करते. पण नालासोपाऱ्यातील घटनेत सुनेने सासूची हत्या केली. ही घटना नालासोपाऱ्यातील प्रगतीनगरमध्ये घडली. ऊर्मिला नंदकिशोर पटवा (५६) असे सासूचे नाव असून चांदणी जय पटवा (२५) असे आरोपी सुनेचे नाव आहे.
चांदणी ही ऊर्मिला पटवा हिची दोन नंबरची सून. चांदणी आणि तिचा मुलगा जय यांचा २०१३ मध्ये बांद्रा येथे विवाह झाला. प्रेमविवाह असल्याने तेव्हापासूनच सासू - सुनेत छोट्या मोठ्या कारणावरून वाद सुरू होते. शुक्रवारी चांदणी व सासू या दोघीच घरात असताना किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की चांदणीने घरातील भाजी कापण्याच्या चाकुने आपल्या सासुचे नाक कापले. यात सासू गंभीर जखमी झाली. तिला रूग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केली. या घटनेमुळे कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. या खुनी सुनेला तुळींज पोलीसांनी ताब्यात घेते असून उर्मीलाच्या हत्येचे आणखी काही कारण आहे का याचा शोध सुरू आहे. (वार्ताहर)

Web Title: List of Sunni killings in the cavity