जीवन एक उत्सव - भानुमती नरसिंहन

By Admin | Updated: November 24, 2015 02:05 IST2015-11-24T02:05:14+5:302015-11-24T02:05:14+5:30

आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’तर्फे ११ ते १३ मार्च २०१६ या कालावधीत जागतिक सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे

Life is a festival - Pandora Narasimhan | जीवन एक उत्सव - भानुमती नरसिंहन

जीवन एक उत्सव - भानुमती नरसिंहन

मुंबई : आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’तर्फे ११ ते १३ मार्च २०१६ या कालावधीत जागतिक सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री श्री रविशंकर यांच्या भगिनी भानुमती नरसिंहन यांनी लोअर परेल येथील कामगार मैदानात आयोजित पत्रकार परिषदेत यासंबंधीची घोषणा केली.
भानुमती नरसिंहन यांनी महोत्सवाच्या निमित्ताने ‘लोकमत’शी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्त्वानुसार हा महोत्सव नवी दिल्ली येथे पार पडणार आहे. जीवन एक उत्सव आहे. आज विविध देशांच्या विभिन्न संस्कृतीच्या माध्यमातून या जीवनरूपी महोत्सवाचा आनंद घेणे गरजेचे आहे. श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट आॅफ लिव्हिंगला ३५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्ली येथील मयूर विहार मेट्रो स्थानकाजवळील ७ एकर जागेत हा महोत्सव भरणार आहे. महोत्सवात ध्यानधारणा आणि विविध लोकसंस्कृतीच्या नृत्यांचे सादरीकरण होणार आहे.
सांस्कृतिक मंत्रालय, पर्यटन मंत्रालय यांच्या मान्यतेने आणि संगीत नाटक अकादमी, ललित कला अकादमी, नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा यांच्या सहयोगाने या भव्य महोत्सवाची आखणी करण्यात आली आहे. जगातील सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा संदेश देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कृतीचे प्रदर्शन आणि पर्यावरणीय संपत्तीचे महत्त्व सांगून त्यांचे संरक्षण या माध्यमातून करण्यात येणार आहे. सर्वसामान्य जनतेसाठीही महोत्सवाची दारे विनामूल्य खुली राहणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Life is a festival - Pandora Narasimhan