वडिलांचा मित्र सांगून वृद्धाचा मुलीवर अत्याचार; वडाळ्यात ७० वर्षीय व्यक्तीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 08:20 IST2024-09-26T08:20:13+5:302024-09-26T08:20:22+5:30
वृद्धाने १४ वर्षीय मुलीला कांजूर मार्ग हायवेलगत एका कंटेनरमध्ये नेत लैंगिक अत्याचार केला.

वडिलांचा मित्र सांगून वृद्धाचा मुलीवर अत्याचार; वडाळ्यात ७० वर्षीय व्यक्तीला अटक
मुंबई : वडिलांचा मित्र असल्याचे सांगत एका वृद्धाने १४ वर्षीय मुलीला कांजूर मार्ग हायवेलगत एका कंटेनरमध्ये नेत लैंगिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी मुक्तार अहमद मोहमद शेख (७०) या आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळा परिसरात राहणारी १४ वर्षीय मुलगी सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास घराजवळ खेळत असताना शेख तेथे आला. त्याने ‘मी तुझ्या वडिलांचा मित्र असून, त्यांनी तुला सोबत आणण्याचा निरोप दिला आहे,’ असे सांगत मुलीला आपल्याबरोबर येण्यास सांगितले. मुलगी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याच्यासोबत गेली. त्यानंतर शेखने टॅक्सी, रेल्वे आणि पुढे रिक्षाने प्रवास करत तिला कांजूर मार्गे हायवेलगत असलेल्या गवतामधील कंटेनरमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.