मी इंजिनिअर होणार होतो पण वकील झालो, वकिली केलीच नाही; गडकरींनी सांगितलं यशाचं गमक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 03:29 PM2023-10-13T15:29:35+5:302023-10-13T15:32:40+5:30

एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यशाचे गमक सांगितले.

I was going to be an engineer but became a lawyer, not a lawyer; Gadkari told the secret of success | मी इंजिनिअर होणार होतो पण वकील झालो, वकिली केलीच नाही; गडकरींनी सांगितलं यशाचं गमक

मी इंजिनिअर होणार होतो पण वकील झालो, वकिली केलीच नाही; गडकरींनी सांगितलं यशाचं गमक

मुंबई- मला इंजिनिअर व्हायचे होते पण होऊ शकलो नाही, घरचे म्हणाले वकील हो त्याने लग्न तरी होईल, पण मी म्हणालो नाही झालं तर मुलगी शोधून आणेन आणि वकील झालो पण प्रॅक्टिस केली नाही.  मी नोकरी मागणारा नाही तर देणारा झालो. मी 15 हजार जणांना रोजगार दिला.आयुष्यामध्ये नवीन शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी शिक्षणापासून ते मंत्रिपदापर्यंतचे अनुभव सांगितले.

तुमचं वेळापत्रक अमान्य; सरन्यायाधीश संतापले,आमदार अपात्रता सुनावणीवरून विधानसभा अध्यक्षांना सुनावले

यावेळी पुढे बोलताना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, गाव संपन्न करायचं असेल तर शेतकरी आनंदाता नाही तर ऊर्जा दाता झाला पाहिजे मी त्यावर काम करतोय. महिला रिक्षा चालवायला लागल्या ही आनंदाची बाब आहे. डिग्री मिळवल्यावर माणूस सुशिक्षित होतो मात्र सुसंस्कृत होतो असे नाही, डिग्री घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे झाले पाहिजे, असंही गडकरी म्हणाले.

"ज्या लोकांना मी मोठं समजत होतो ते छोटे निघाले. मात्र जे लहान समजत होतो ते मोठे निघाले. त्यामुळे डिग्री घेतली म्हणजे हुशार असं होतं नाही. मी विध्दवान नाही हे मला सांगायला लाज वाटत नाही. मला ६ डी लीट मिळाल्या पण मी डॉक्टर लावत नाही, असंही गडकरी म्हणाले. यावेळी बोलताना गडकरी यांनी त्यांच्या शिक्षणापासून ते व्यवसायापर्यंतच्या आठवणी सांगितल्या. गडकरी म्हणाले, मला इंजिनिअर व्हायचे होते. पण होऊ शकलो नाही, घरचे म्हणाले वकील हो त्याने लग्न तरी होईल, पण मी म्हणालो नाही झालं तर मुलगी शोधून आणेन आणि वकील झालो पण प्रॅक्टिस केली नाही. मी नोकरी मागणारा नाही तर देणारा झालो मी १५ हजार जणांना रोजगार दिला, आयुष्यामध्ये नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

नितीन गडकरी म्हणाले, आज आपल्या देशामध्ये इम्पोर्ट काय होत एक्स्पोर्ट काय होत हे पाहिलं पाहिजे त्यावर रिसर्च केलं पाहिजे. पुन्हा एकदा लोक गावाकडे गेले पाहिजेत. कृषी अभ्यासात जल जीवन जंगल जपला पाहिजे. आज फक्त ६५ टक्के जनता गावात राहते ३० टक्के लोकांचे मायग्रेन झाले आहे, कारण गावात रस्ता नाही, शाळा नाही, दवाखाना आहे डॉक्टर नाही, वीज नाही अशी परिस्थिती आहे. गाव संपन्न करायचं असेल तर शेतकरी आनंदाता नाही तर ऊर्जा दाता झाला पाहिजे, मी त्यावर काम करतोय. त्यामुळे आता तर हवाई इंजिन दाता झालाय, असंही गडकरी म्हणाले.

Web Title: I was going to be an engineer but became a lawyer, not a lawyer; Gadkari told the secret of success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.