I did not like word 'nightlife'; Chief Minister Uddhav Thackeray spoke for the first time, saying ... | मला 'नाइटलाइफ' शब्दच आवडत नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले...

मला 'नाइटलाइफ' शब्दच आवडत नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले...

मुंबई - पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नाइटलाइफ संकल्पनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे. मुळात मला नाइटलाइफ हा शब्दच आवडत नाही, आम्ही काही भागात हा प्रयोग करुन पाहणार आहोत असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे. एका आयपीएस अधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, नाइटलाइफ संकल्पना राज्यभरात लागू करण्याचा सध्या विचार नाही, प्रत्येक शहराची स्वतंत्र संस्कृती असते. मुंबईतल्या काही भागात आम्ही हा प्रयोग करणार आहोत. मला मुळात नाइटलाइफ शब्द आवडत नाही. एकदा आम्ही मॉल्स, रेस्टॉरंट, हॉटेल्स यांना २४ तास खुले ठेवण्याची परवानगी देणार आहोत. त्यानंतर याचा आढावा आणि परिणाम याची माहिती घेऊन पुढचा निर्णय घेऊ असं सांगितले. या विधानाची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. 

'...तर मुंबईत निर्भयासारखी हजारो प्रकरणे घडतील'; भाजपा नेत्याचा दावा

हिंमत असेल तर मंत्रालय 24 तास चालू ठेवा; 'नाइटलाइफ'वरून राणेंचा सेनेला टोला

मुंबईत २६ जानेवारीपासून नाइटलाइफ सुरू; आदित्य ठाकरेंचा प्रयोग यशस्वी होणार?

याबाबत वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जगभरात अनेक ठिकाणी ही संकल्पना लागू आहे. पण सर्व लोक पंचतारांकित हॉटेल्समध्ये जेवण करण्यासाठी जात नाही तर मॉल्स आणि लहान हॉटेल्समध्ये जाणं पसंत करतात असं ते म्हणाले. 

महानगरी मुंबईत नाइटलाइफ सुरू व्हावे म्हणून गेली काही वर्षे आग्रही असणारे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी २६ जानेवारीपासून तीन ठिकाणी याचा प्रयोग राबविणार असल्याची घोषणा शुक्रवारी केली. नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा अनिवासी क्षेत्रातून याची सुरुवात होईल. या भागातील मॉल, दुकाने, हॉटेल्स २४ तास खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे असं त्यांनी सांगितले. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सध्या पोलिस यंत्रणेवरील ताण पाहता नाइटलाइफबाबत २२ जानेवारीला होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल. त्यानंतर यावर निर्णय होईल असं सांगितले आहे. 

मुंबईत ‘नाइटलाइफ’साठी प्रशासनाच्या हालचाली सुरू, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय अपेक्षित

नाइटलाइफमुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटेल, महापौर किशोरी पेडणेकर यांचे मत

नाइटलाइफसाठी मुंबईतील परिसरांची यादी करण्याची तयारी; आदित्य ठाकरेंचे स्वप्न पूर्ण होणार?

दरम्यान, मुंबईत मद्य संस्कृती लोकप्रिय झाल्यास महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तसेच नाइटलाइफमुळे हजारो निर्भयासारख्या घटना घडतील असा दावा भाजपाचे नेते राज पुरोहित यांनी केला आहे. त्याचप्रमाणे भारतासाठी ही संस्कृती योग्य आहे का याचा विचार करावा असं देखील राज पुरोहित यांनी सांगितले आहे. 
 

Web Title: I did not like word 'nightlife'; Chief Minister Uddhav Thackeray spoke for the first time, saying ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.