Mumbai Mayor Salary: मुंबईच्या महापौराला पगार किती मिळतो? त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 17:00 IST2026-01-16T16:45:54+5:302026-01-16T17:00:15+5:30
BMC Mayor Salary and Interesting Facts: मुंबई पालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे

Mumbai Mayor Salary: मुंबईच्या महापौराला पगार किती मिळतो? त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात?
Mumbai Mayor Salary and Interesting Facts: आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) वार्षिक बजेट ७५ हजार कोटी रुपयांच्याही पुढे आहे. अशा या धनाढ्य अशा स्थानिक स्वराज संस्थेच्या अर्थात मुंबईचामहापौर होणे ही प्रतिष्ठेची बाब असून, या महानगरपालिकेच्या महापौराला किती पगार मिळतो, जाणून घेऊया.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मुंबईच्या महापौरांना तांत्रिकदृष्ट्या 'पगार' मिळत नाही. राज्य सरकार आणि महापालिकेच्या नियमांनुसार, त्यांना दरमहा मानधन दिले जाते. मुंबईच्या महापौराला मूळ मानधन हे सुमारे ६,००० रुपये प्रति महिना इतकेच मिळते. त्याशिवाय महापौरांना विविध प्रकारचे भत्ते आणि इतर उत्पन्नही दिले जाते. मुंबईच्या महापौर पदावर बसलेल्या नगरसेवकाला दूरध्वनी वापरसाठीचा भत्ता, आतिथ्य भत्ता अशाप्रकारचे मिळून हे मासिक उत्पन्न ५० ते ५५ हजार रुपयांपर्यंत जाते. यानुसार, महापौराला वर्षाला साधारण ६ ते ६.५० लाख रुपयांचे मानधन मिळते आणि या पदासाठी ठराविक वेतन श्रेणी नसल्यामुळे वार्षिक वेतनवाढही मिळत नाही.
Mumbai Mayor Salary: मुंबईच्या महापौराला पगार किती मिळतो? त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात?
विशेष बाब म्हणजे, मानधनाचा आकडा जरी मर्यादित असला तरी शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौरांना मिळणाऱ्या सुविधा अत्यंत उच्च दर्जाच्या असतात. महापौरांसाठी मुंबईत भव्य शासकीय बंगला (महापौर निवास) उपलब्ध असतो. सध्या हे निवासस्थान भायखळा येथील राणीच्या बागेतील बंगल्यात आहे. महापौरांना लाल दिवा असलेली शासकीय गाडी, वैयक्तिक ड्रायव्हर मिळतो. त्यांच्या दिमतीला निवासस्थानी आणि कार्यालयात विशेष कर्मचारी वर्ग असतो. तसेच, मुंबईच्या महापौराचे अधिकृत दौरे, बैठका आणि त्यांच्याकडे येणाऱ्या परदेशी पाहुण्यांच्या आदरातिथ्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र खर्च केला जातो.