तीन मिनिटांत छातीच्या स्तरावर मारले ९५० पंचेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:24 IST2021-02-05T04:24:12+5:302021-02-05T04:24:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथमधील रोहित भोरे या तरुणाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. तीन मिनिटांत ...

Hit 950 punches at chest level in three minutes | तीन मिनिटांत छातीच्या स्तरावर मारले ९५० पंचेस

तीन मिनिटांत छातीच्या स्तरावर मारले ९५० पंचेस

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : अंबरनाथमधील रोहित भोरे या तरुणाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. तीन मिनिटांत छातीच्या स्तरावर ९५० पंचेस न थांबता मारून रेकॉर्ड केला आहे.

कराटे प्रकारातील चुदान झुकी म्हणजेच छातीच्या स्तरावर पंचेस मारणे. रोहितला गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसाठी तीन मिनिटांत ९१९ पंच मारायचे होते. मात्र, त्याने त्याही पुढे जाऊन ९५० पंच मारले. आतापर्यंत कराटे प्रकारातील गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमधील हा पहिला विक्रम आहे.

हा रेकॉर्ड झाल्यावर सगळ्यांनी रोहितचे कौतुक केले. यापूर्वीही रोहितच्या नावाने नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन येथे नोंद झाली. हा कार्यक्रम ऑनलाईन माध्यमातून अंबरनाथमध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमाला स्पोर्ट एक्सपर्ट राजेंद्र तेले, जिल्हा क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंके, पशुसंवर्धन अधिकारी धर्मराज रायबोले, अंबरनाथचे अतिरिक्त मुख्याधिकारी धीरज चव्हाण, पोलीस निरीक्षक संजय भेंडे, मधुकर भोगे व नगरसेविका प्रज्ञा बनसोडे उपस्थित होत्या.

फोटो आहे - ०१रोहित भोरे

Web Title: Hit 950 punches at chest level in three minutes