बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 05:25 IST2026-04-26T05:24:55+5:302026-04-26T05:25:36+5:30

हल्लेखोरांना मदत करण्यात महत्त्वाची भूमिका, या प्रकरणात आतापर्यंत एकूण २६ आरोपींना अटक करण्यात आली आहे

High Court rejects bail plea of Uttar Pradesh businessman in Baba Siddiqui murder case | बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते झियाउद्दीन अब्दुल रहीम उर्फ बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत कथित सहभागाचा आरोप असलेल्या उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला.

न्या.  आर.एम. जोशी यांच्या एकलपीठाने अखिलेंद्र प्रताप सिंह यांचा जामीन अर्ज फेटाळताना, आरोपांचे गांभीर्य पाहता सध्या दिलासा देणे योग्य नसल्याचे नमूद केले. माजी मंत्री असलेले ६६ वर्षीय सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी वांद्रे पूर्व येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. विधानसभा निवडणुकांपूर्वी पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर ते मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर रात्री बाहेर पडत असताना हा हल्ला झाला. त्यांना तीन गोळ्या लागल्या, तर दोन गोळ्या त्यांच्या वाहनाला लागल्या.

पोलिस तपासात गुरमेल बलजीत सिंह आणि शिवकुमार गौतम हे शूटर असल्याचे समोर आले असून त्यांचा संबंध लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या टोळीशी असल्याचा आरोप आहे.  या प्रकरणात आतापर्यंत एकूण २६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

हल्लेखोरांना मदत करण्यात महत्त्वाची भूमिका
आरोपीवर खून, गुन्हेगारी कट आणि संबंधित गुन्ह्यांखाली तरतुदी लावण्यात आल्या आहेत. तसेच प्रतिबंधित शस्त्रास्त्रांच्या बाळगण्याबाबत शस्त्र कायदा आणि मकोका अंतर्गतही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जामीन अर्जाला विरोध करताना राज्य सरकार आणि सिद्दीकी यांच्या कुटुंबीयांनी वतीने वरिष्ठ वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपीने हल्लेखोरांना मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.  दुसरीकडे, बचाव पक्षाने ठोस पुरावे नसल्याचा युक्तिवाद करत पोलिस अधिकारांचा गैरवापर झाल्याचा आरोप केला. 

Web Title : बाबा सिद्दीकी हत्याकांड: यूपी के व्यवसायी की जमानत याचिका हाईकोर्ट ने खारिज की

Web Summary : बॉम्बे हाईकोर्ट ने एनसीपी नेता बाबा सिद्दीकी की हत्या के प्रयास में शामिल यूपी के एक व्यवसायी की जमानत याचिका खारिज कर दी। अदालत ने साजिश और हमलावरों की मदद करने सहित आरोपों की गंभीरता का हवाला देते हुए राहत देने से इनकार कर दिया। सिद्दीकी पर अक्टूबर 2024 में हमला हुआ था।

Web Title : Baba Siddique Murder Case: UP Businessman's Bail Rejected by High Court

Web Summary : The Bombay High Court rejected bail for a UP businessman accused of involvement in the attempted murder of NCP leader Baba Siddique. The court cited the seriousness of the charges, including conspiracy and aiding the shooters, in denying relief. Siddique was attacked in October 2024.