महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:05 IST2021-04-12T04:05:53+5:302021-04-12T04:05:53+5:30

मुंबई : महात्मा जोतिबा फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त मुंबई पालिकेच्या पालिका सभागृहातील त्यांच्या अर्धपुतळ्यास महापौर किशोरी पेडणेकर ...

Greetings to Mahatma Jotiba Phule | महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन

महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन

मुंबई : महात्मा जोतिबा फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त मुंबई पालिकेच्या पालिका सभागृहातील त्यांच्या अर्धपुतळ्यास महापौर किशोरी पेडणेकर यांनी रविवारी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपायुक्‍त हर्षद काळे, महापालिका उपचिटणीस सईद कुडाळकर, महापौरांच्या स्वीय सचिव भाग्यश्री नलावडे उपस्थित होते.

.......................................

काेराेना काळात ‘बेस्ट’ दिलासा

मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी वीकेंड लाॅकडाऊन सरकारने जाहीर केले आहे. तरीही नागरिकांसाठी बेस्ट बसची साेय उपलब्ध हाेती. वीकेंड लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी बेस्ट बसमधून ७ लाख ६६ हजार प्रवाशांनी प्रवास केला, अशी माहिती बेस्टकडून देण्यात आली.

...............................

दादरच्या पालिका शाळेची दुरुस्ती

मुंबई : दादर प. येथील भवानीशंकर महापालिका शाळेची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या शाळेच्या संरचनात्मक दुरुस्ती व दर्जोन्नतीचा पालिकेने निर्णय घेतला आहे. त्यानुसार दोन कोटी ८६ लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

..................................

माहीममध्ये रुग्णांसाठी मल्टीस्पेशालिटी चिकित्सालय

मुंबई : नागरिकांना विविध आजारांवर एकाच ठिकाणी चांगले उपचार घेता यावेत, त्यांना दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी माहीम येथे मल्टीस्पेशालिटी चिकित्सालय बांधण्यात येणार आहे. ५४ हजार ५६० चौरस फुटांच्या जागेवर ही इमारत उभी राहणार आहे.

.....................................

Web Title: Greetings to Mahatma Jotiba Phule