A four-wheeler collided with a subway | चार चाकी वाहनावर कोसळला मेट्रोचा दगड
चार चाकी वाहनावर कोसळला मेट्रोचा दगड

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ च्या आरेमधील प्रस्तावित कारशेडला पर्यावरणवाद्यांकडून जोरदार विरोध सुरू असतानाच बुधवारी अभिनेत्री मौनी रॉय यांच्या चार चाकी गाडीवर जुहू येथे मेट्रोच्या कामाचा दगड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत त्या बचावल्या असून, त्यांच्या कारचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
यासंदर्भातील व्हिडीओ मौनी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या माहितीमध्ये त्या म्हणत आहेत की, मी आता कामासाठी निघाले आहे. जुहू सिग्नलवर एक मोठा दगड कारवर पडला.
११ व्या मजल्याइतक्या उंचीवरून हा दगड पडला. मी काहीच करू शकत नाही. मात्र, विचार करा कोणी रस्त्यावरून चालत असते तर काय झाले असते?
मुंबई मेट्रोच्या निष्काळजीपणासाठी काय करावे, कोणीतरी सल्ला
द्यावा.
एमएमआरडीएच्या म्हणण्यानुसार, बुधवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. कोसळलेली वस्तू रिंग स्पॅनर होती. पंधरा मीटर उंचीवरून कामगाराच्या हातातून ही वस्तू निसटली. या दुर्घटनेत चारचाकी वाहनाचे नुकसान झाले असून, सदर प्रकरणाची चौकशी केली जाईल. शिवाय चारचाकी वाहनाच्या मालकाला योग्य ती नुकसान भरपाई दिली जाईल.


Web Title: A four-wheeler collided with a subway
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.