परिस्थितीजन्य पुराव्यांवरच भर

By Admin | Updated: August 31, 2015 02:05 IST2015-08-31T02:05:56+5:302015-08-31T02:05:56+5:30

बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील आरोपींना बचावासाठी एकही संधी मिळू नये, यासाठी मुुंबई पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा चालविल्याचे दिसून येत आहे

Focusing on circumstantial evidences | परिस्थितीजन्य पुराव्यांवरच भर

परिस्थितीजन्य पुराव्यांवरच भर

मुंबई : बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील आरोपींना बचावासाठी एकही संधी मिळू नये, यासाठी मुुंबई पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा चालविल्याचे दिसून येत आहे. रविवारी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना व श्याम राय यांना घेऊन पंचनाम्यासाठी घटनास्थळी गेले. मात्र, पंचनामा न करताच पोलीस माघारी फिरले. हत्येच्या दिवशी मुंबई ते पेण या प्रवासात हे तिघे कुठे थांबले तेथील पुरावे आणि साक्षीदार मिळविण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. शीनाची हत्या ३ वर्षांनंतर उजेडात आल्याने पोलिसांकडे थेट पुरावा किंवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. पेण पोलिसांनी ज्या ठिकाणी मृतदेह पुरला तेथून काही अवशेष मिळाले आहेत. या अवशेषांची डीएनए चाचणी होणार आहे. डीएनए चाचणीतून हे अवशेष शीनाचे आहेत का यावर प्रकाश पडेल. त्यामुळे पोलिसांसाठी डीएनए अहवाल अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरू शकेल.

Web Title: Focusing on circumstantial evidences