महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमानअपघातात दुर्दैवी निधन झालं. या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या लोकांमध्ये फ्लाइट अटेंडंट पिंकी माली हिचाही समावेश होता. पिंकीच्या आईने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अपघाताच्या आदल्या रात्रीच मुलीशी बोलणं झालं होतं. पिंकी खूप आनंदात होती आणि आपल्या ड्युटीबद्दल उत्साही होती.
"पिंकीने मला सांगितलं होतं की, ती अजित पवारांसोबत आधी बारामतीला जाणार आहे आणि तिथून तिला नांदेडला जायचं आहे. आता ती आमच्यापासून कायमची दूर गेली आहे" असं म्हटलं. अपघाताची बातमी पिंकीच्या कुटुंबीयांना कोणत्याही अधिकृत सूचनेद्वारे नाही, तर टीव्हीवरून समजली. आईने म्हटलं की, "जेव्हा टीव्हीवर अजित पवारांचं विमान कोसळल्याची बातमी पाहिली, तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. हे सर्व कसं घडलं, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही."
"करतो, बघतो, सांगतो हे शब्द अजितदादांच्या डिक्शनरीत नव्हते"; एकनाथ शिंदेंची भावुक पोस्ट
"दादा तुमचं नाव हृदयात कायम कोरलेलं राहील; सर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रू, पोरकेपणाची भावना"
एकीकडे मुलीच्या जाण्याचे मोठं दुःख असताना दुसरीकडे व्यवस्थेबद्दल त्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. इतकी मोठी चूक नक्की झाली कशी? असा सवाल पिंकीच्या आईने उपस्थित केला आहे. "माझी मुलगी तर आता परत येणार नाही, ती आमच्यापासून खूप दूर गेली आहे. पण हा अपघात नेमका कसा झाला, हे जाणून घेण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे."
"राष्ट्रवादी पुन्हा, आपला दादा लय रुबाबदार..."; उत्कर्ष शिंदेने सांगितली अजित पवारांची 'ती' आठवण
"प्रत्येक ठिकाणी वेळेत जाणारे दादा आज चुकीच्या वेळी गेले..."; जितेंद्र आव्हाड भावुक
"मतभेद होते पण आदर कायम..."; अजित पवारांच्या निधनाने प्रियंका चतुर्वेदींना अश्रू अनावर
"केवळ माझी मुलगी नव्हती, तर माझ्या संघर्षातील सोबती होती. स्वतःच्या मेहनतीने तिने आपल्या आईचं प्रत्येक स्वप्न पूर्ण केलं होतं" असं पिंकीच्या आईने म्हटलं आहे. एनडीटीवीशी बोलताना पिंकीच्या आईने आपल्या भावना व्यक्त केल्या. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा घेण्यासाठी अजित पवार मुंबईहून बारामती येथे जात होते. सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी बारामती विमानतळावर उतरताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर विमानाला मोठी आग लागली. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राज्य शोकाकूल झाले आहे.
Web Summary : Flight attendant Pinky Mali died in the Ajit Pawar plane crash. Her mother recounts their last conversation and demands a thorough investigation into the accident, questioning how such a tragedy occurred. She seeks answers for her daughter.
Web Summary : अजित पवार के विमान दुर्घटना में फ्लाइट अटेंडेंट पिंकी माली की मौत हो गई। उसकी माँ ने उनकी अंतिम बातचीत को याद किया और दुर्घटना की गहन जाँच की मांग की, यह सवाल करते हुए कि ऐसी त्रासदी कैसे हुई। वह अपनी बेटी के लिए जवाब चाहती है।