मच्छीमारांचे आंदोलन: राज्यपालांचे ओएनजीसीला पत्र

By Admin | Updated: March 12, 2015 23:01 IST2015-03-12T23:01:37+5:302015-03-12T23:01:37+5:30

वसई ते थेट पालघर, डहाणूच्या समुद्रात सध्या तेल व नैसर्गिक वायू महामंडळातर्फे तेल सर्वेक्षण सुरू असल्यामुळे स्थानिक मच्छीमारांना त्या परिसरात मासेमारी

Fishermen's Movement: Letter to Governor ONGC | मच्छीमारांचे आंदोलन: राज्यपालांचे ओएनजीसीला पत्र

मच्छीमारांचे आंदोलन: राज्यपालांचे ओएनजीसीला पत्र

वसई : वसई ते थेट पालघर, डहाणूच्या समुद्रात सध्या तेल व नैसर्गिक वायू महामंडळातर्फे तेल सर्वेक्षण सुरू असल्यामुळे स्थानिक मच्छीमारांना त्या परिसरात मासेमारी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मध्यंतरी महामंडळाच्या या निर्णयाचे जोरदार पडसाद पश्चिम किनारपट्टीवरील मच्छीमार समाजामध्ये उमटले व अनेक ठिकाणी आंदोलनेही झाली. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. आनंद ठाकूर यांनी राज्यपालांना साकडे घातल्यानंतर राज्यपालांच्या सचिवांनी महामंडळाला पत्र पाठवले आहे.
गेल्या महिन्यापासून खोल समुद्रात तेल सर्व्हेक्षणाचे काम सुरू झाले आहे. हे काम सुरू असेपर्यंत स्थानिक मच्छीमारांना या क्षेत्राच्या आसपासच्या परिसरात मासेमारी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मासेमारी व्यवसायाला जबरदस्त आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. आॅगस्टपर्यंत मासेमारीला बंदी होती त्यानंतर मासेमारीला सुरूवात झाली परंतु अल्पावधीतच अशा प्रकारचा निर्णय झाल्यामुळे मच्छीमार समाज हवालदिल झाला आहे. या निर्णयाविरूद्ध मच्छीमारांच्या संघटनांनी समुद्रात निदर्शने करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो फसला. किनारपट्टीवर अनेक आंदोलने झाली. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. आनंद ठाकूर यांनी राज्यपालांना पत्र पाठवल्यानंतर राज्यपालांच्या सचिवांनी तेल व नैसर्गिक वायू महामंडळाला पत्र पाठवले आहे. यासंदर्भात काय कार्यवाही होते याकडे पश्चिम किनारपट्टीवरील हजारो मच्छीमारांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Fishermen's Movement: Letter to Governor ONGC