जलबोगद्यांच्या परिसरात कुंपण

By Admin | Updated: September 16, 2014 02:49 IST2014-09-16T02:49:58+5:302014-09-16T02:49:58+5:30

मुंबई शहर आणि उपनगराला पाणीपुरवठा करणा:या यंत्रणा या नेहमीच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असतात. शिवाय जलबोगद्यांच्या झडपांचा परिसरही गर्दुल्ल्यांच्या विळख्यात पडलेला असतो.

Fencing in the area of ​​waterborne | जलबोगद्यांच्या परिसरात कुंपण

जलबोगद्यांच्या परिसरात कुंपण

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगराला पाणीपुरवठा करणा:या यंत्रणा या नेहमीच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असतात. शिवाय जलबोगद्यांच्या झडपांचा परिसरही गर्दुल्ल्यांच्या विळख्यात पडलेला असतो. यावर नामी उपाय म्हणून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जलबोगद्यांच्या झडपांच्या परिसरात तारेचे कुंपण लावण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातील पाणीपुरवठय़ादरम्यान पाण्याची चोरी आणि गळती रोखण्यासाठी महापालिका प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत असते. महापालिका प्रशासनाने पाण्याची चोरी, गळती रोखण्यासाठी जलबोगदेही बांधले आहेत. 
मात्र या जलबोगद्यांच्या झडपा आणि नियंत्रण कक्ष हे जमिनीवर आहेत. जलबोगद्यांच्या झडपा व नियंत्रण कक्ष हे मुंबई शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आहेत. परिणामी, येथील गर्दुल्ल्यांचा उपद्रव लक्षात 
घेता पालिकेने येथील सुरक्षेसाठी 
हा निर्णय घेतला आहे. तसेच पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकानेदेखील महापालिका प्रशासनाला तशा सूचना केल्या आहेत. परिणामी जलबोगद्यांच्या झडपांच्या परिसरात तारेचे कुंपण बसविण्यात येणार आहे.
दरम्यान, ओव्हल मैदान 
आणि स. का. पाटील या उद्यानातील झडपांच्या परिसरात तारांचे कुंपण बसविण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल 1 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Fencing in the area of ​​waterborne