तब्बल ७९ नगरसेवकांच्या निवडीला काेर्टात आव्हान; उद्धवसेना, भाजपच्या प्रत्येकी १९ जणांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 10:30 IST2026-05-19T10:30:30+5:302026-05-19T10:30:40+5:30

याचिका सादर करणाऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची संख्या कमी असून अन्य उमेदवारांनीच   आव्हान दिले आहे.

Election of 79 corporators challenged in court; Uddhav Sena, BJP include 19 candidates each | तब्बल ७९ नगरसेवकांच्या निवडीला काेर्टात आव्हान; उद्धवसेना, भाजपच्या प्रत्येकी १९ जणांचा समावेश

तब्बल ७९ नगरसेवकांच्या निवडीला काेर्टात आव्हान; उद्धवसेना, भाजपच्या प्रत्येकी १९ जणांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतरही शह-काटशहाचे राजकारण सुरू असून तब्बल ७९ नगरसेवकांच्या निवडीला लघुवाद काेर्टात आव्हान देण्यात आले आहे. भाजप आणि उद्धवसेनेच्या प्रत्येकी १९ उमेदवारांविरोधात प्रतिस्पर्ध्याकडून न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. तर शिंदेसेनेच्या ७, काँग्रेसच्या ९ आणि एमआयएमच्या ४ नगरसेवकांच्या निवडीविरोधात काेर्टात याचिका सादर करण्यात आली आहे. या याचिका सादर करणाऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची संख्या कमी असून अन्य उमेदवारांनीच   आव्हान दिले आहे.

शिंदेसेनेच्या राजुल पटेल (प्रभाग क्रमांक ६१) काँग्रेसच्या दिव्या सिंग,  तृप्ती वायकर (प्रभाग क्र. ७३) यांनी उद्धवसेनेच्या लोना रावत आणि नाना आंबोले यांनी उद्धवसेनेचे सचिन पडवळ (प्रभाग क्र. २०६), काँग्रसेच्या शीतल म्हात्रे (प्रभाग क्र. १)  यांनी शिंदेसेनेच्या रेखा यादव यांच्या निवडीला आव्हान दिले आहे.  प्रभाग क्र. १९८ मधून अखिल भारतीय सेनेच्या वंदना गवळी यांनी उद्धवसेनेच्या अबोली खाडे यांच्या निवडीला आव्हान दिले आहे.   एमआयएमचे गटनेते  विजय उबाळे यांच्या निवडीलाही आव्हान देण्यात 
आले आहे. 

बनावट जातप्रमाणपत्र
विभाग क्रमांक २१९ मधील शिंदेसेनेचे विजयी उमेदवार राजेश सोनावळे यांच्या उमेदवारीला, तर मनसेचे पराभूत उमेदवार विश्वजित ढोलम  यांच्यासह आणखी दोन उमेदवारांनी आव्हान दिले आहे, अशी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली.
बनावट जातप्रमाणपत्र सादर करणे, आचारसंहिता भंग, मालमत्तेचा चुकीचा तपशील, कागदपत्रांची पूर्तता आदी कारणास्तव प्रतिस्पर्धी उमेदवारांनी  विजयी उमेदवारांच्या निवडीला न्यायालयात आव्हान दिल्याचे समजते. 

एमआयएम धोक्यात 
या पक्षाच्या प्रभाग क्रमांक १३८ मधील नगरसेविका रोशन शेख यांच्या जातपडताळणी प्रमाणपत्राला आव्हान देण्यात आले असून कनिष्ठ आणि उच्च न्यायालयाने  याचिकाकर्त्यांच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे शेख या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे. तेथील निर्णयावर त्यांच्या नगरसेवकपदाचे भवितव्य ठरेल.

Web Title: Election of 79 corporators challenged in court; Uddhav Sena, BJP include 19 candidates each