Deepak Nikalje suspended from Republican party - Rajabhau Sarvade | रिपब्लिकन पक्षातून दीपक निकाळजे निलंबित - राजाभाऊ सरवदे 
रिपब्लिकन पक्षातून दीपक निकाळजे निलंबित - राजाभाऊ सरवदे 

ठळक मुद्देदीपक निकाळजे यांच्या विरुद्ध अनेक तक्रारी पक्षाला प्राप्त झाल्या आहेत. ते रिपब्लिकन पक्षाविरुद्ध  भूमिका घेऊन पक्ष विरोधी काम करीत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.

मुंबई - रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष दीपक निकाळजे यांना  पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार  रिपाइंतून निलंबित करण्यात आले असल्याची अधिकृत घोषणा रिपाइंचे महाराष्ट्र  प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी केली आहे.  

दीपक निकाळजे यांच्या विरुद्ध अनेक तक्रारी पक्षाला प्राप्त झाल्या आहेत. ते रिपब्लिकन पक्षाविरुद्ध  भूमिका घेऊन पक्ष विरोधी काम करीत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. त्यांच्या विरुद्ध  काही  गंभीर आरोपांची तक्रार रिपब्लिकन पक्षाकडे आली आहे. त्यामुळे दीपक निकाळजे यांना रिपब्लिकन पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याची अधिकृत घोषणा रिपाइंचे राज्य  अध्यक्ष भुपेश थुलकर, कार्याध्यक्ष बाबुराव कदम आणि सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी केली आहे. 

Web Title: Deepak Nikalje suspended from Republican party - Rajabhau Sarvade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.