Maharashtra CM: डिअर, उद्धव ठाकरे... मुख्यमंत्रिपदाच्या नवीन इंनिंगसाठी सोनिया गांधींकडून शुभेच्छापत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 05:31 PM2019-11-28T17:31:58+5:302019-11-28T17:35:05+5:30

Maharashtra Government News: उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला देशभरातील बड्या राजकीय नेत्यांना आणि काही सेलिब्रिटींनाही आमंत्रण देण्यात आले आहे.

Dear, Uddhav Thackeray ... Greetings from Sonia Gandhi to Chief Minister of maharashtra by letter | Maharashtra CM: डिअर, उद्धव ठाकरे... मुख्यमंत्रिपदाच्या नवीन इंनिंगसाठी सोनिया गांधींकडून शुभेच्छापत्र

Maharashtra CM: डिअर, उद्धव ठाकरे... मुख्यमंत्रिपदाच्या नवीन इंनिंगसाठी सोनिया गांधींकडून शुभेच्छापत्र

Next

https://www.lokmat.com/topics/maharashtra-assembly-election-2019/नवी दिल्ली - राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत 'महाराष्ट्र विकास आघाडी'चे सरकार स्थापन होत आहेत. या 'महाराष्ट्र विकास आघाडी'चे नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंचा शपथविधी सोहळा सुरू होईल, तत्पूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. Dear उद्धव ठाकरे, असे म्हणून सोनिया यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा दिल्या.  

उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला देशभरातील बड्या राजकीय नेत्यांना आणि काही सेलिब्रिटींनाही आमंत्रण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना उद्याच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही आदित्य ठाकरे यांनी निमंत्रण दिले. निमंत्रण देण्यासाठी बुधवारी रात्री उशिरा आदित्य ठाकरे दिल्लीला पोहोचले. त्यावेळी त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. 
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांना पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे सोनिया गांधी या शपथविधी सोहळ्याला हजर राहू शकणार नाहीत, हे स्पष्ट झालंय. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना, डिअर उद्धव ठाकरे... असे म्हणून सोनियांनी पत्राची सुरुवात केली. 
तुमच्या नवीन राजकीय कारकिर्दीस माझ्याकडून व्यक्तिगत शुभेच्छा. महाराष्ट्रातील जनतेचं हित आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार काम करेल. मी या सोहळ्याला उपस्थित राहू शकत नसल्याचंही सोनियांनी म्हटलंय. तर, भाजपाच्या एकाधिकारशाहीला देशातील जनता तोंड देतेय. त्यामुळे राजकीय वातावरण गढूळ बनलं असून अर्थव्यवस्था कोलमडलीय, असेही सोनिया यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. 


दरम्यान, देशात काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री, द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, अरविंद केजरीवाल यांनी व्यक्तिगत कारण देत शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसह ४०० शेतकऱ्यांना आणि एका वारकरी दाम्पत्यालाही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
 

Web Title: Dear, Uddhav Thackeray ... Greetings from Sonia Gandhi to Chief Minister of maharashtra by letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.