CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 09:55 IST2026-04-22T09:54:26+5:302026-04-22T09:55:50+5:30

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे मंगळवारी दुपारी ३.१८ वाजता चुकीच्या सिग्नलमुळे  गोंधळ उडाला. बदलापूरवरून सीएसएमटी स्थानकात येणाऱ्या धिम्या लोकलला चुकीचा सिग्नल मिळाल्याने दोन लोकल एकाच ट्रॅकवर आल्या.

CSMT: A major disaster was averted at CSMT! Two locals on the same track due to wrong signal; What exactly happened? | CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?

CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे मंगळवारी दुपारी ३.१८ वाजता चुकीच्या सिग्नलमुळे  गोंधळ उडाला. बदलापूरवरून सीएसएमटी स्थानकात येणाऱ्या धिम्या लोकलला चुकीचा सिग्नल मिळाल्याने दोन लोकल एकाच ट्रॅकवर आल्या; परंतु मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे स्थानकात येणारी लोकल थांबवण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला. 

बदलापूरवरून सीएसएमटीच्या दिशेला येणारी लोकल सहाव्या मार्गावरून प्लॅटफॉर्म चारच्या दिशेने जाणार होती. तिला त्यानुसार सिग्नल मिळणे अपेक्षित होते. मात्र, स्टेशन मॅनेजरने त्या लोकलला  प्लॅटफॉर्म क्रमांक ५ कडे जाण्याचा सिग्नल दिला. त्यानुसार सहाव्या ट्रॅकवरून ती लोकल पाचच्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघाली. दरम्यान, प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर खोपोली लोकल अगोदरच उभी होती. 

तत्काळ कार्यवाही

घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बदलापूर लोकलला  मागे घेऊन सुरक्षित अंतरावर थांबवण्यात आले. त्यानंतर प्लॅटफॉर्म ५ ची लोकल बाहेर काढून अप दिशेच्या लोककला प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर आणण्यात आले आणि टिटवाळ्याच्या दिशेने रवाना करण्यात आले. 

धिम्या, जलद लोकल खोळंबल्या

सीएसएमटी स्थानकावर येणाऱ्या लोकलसाठी होम सिग्नल, इनर होम सिग्नल आणि प्लॅटफॉर्म सिग्नल अशा तीन टप्प्यांत परवानगी दिली जाते. या प्रक्रियेत झालेल्या चुकीमुळे संबंधित लोकलने प्लॅटफॉर्म पाचचा होम सिग्नल ओलांडला; मात्र पुढील इनर होम सिग्नल लाल असल्याचे पाहून मोटरमनने प्रसंगावधान राखत लोकल थांबवली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकारामुळे सुमारे २५ मिनिटे सीएसएमटी स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ५, ६, ७ आणि ८ वर लोकलची ये-जा पूर्णपणे ठप्प झाली.  दरम्यान, दरम्यान, या घटनेसाठी दोषी ठरवत ‘सीएसएमटी’च्या स्टेशन मॅनेजरला निलंबित करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title : सीएसएमटी पर बड़ा हादसा टला! एक ही ट्रैक पर दो लोकल ट्रेनें।

Web Summary : सीएसएमटी पर सिग्नल की गलती से बड़ा हादसा टल गया, दो लोकल ट्रेनें एक ही ट्रैक पर आ गईं। मोटरमैन की तत्परता से टक्कर टल गई। घटना के बाद स्टेशन मैनेजर को निलंबित कर दिया गया, जिससे 25 मिनट तक रेल यातायात बाधित रहा।

Web Title : Major mishap averted at CSMT! Two locals on same track.

Web Summary : A major accident was averted at CSMT due to a signal error, placing two local trains on the same track. The motorman's quick thinking prevented a collision. The station manager was suspended after the incident disrupted train traffic for 25 minutes.