सी. पी. राधाकृष्णन झाले महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी दिली शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 05:59 IST2024-08-01T05:58:51+5:302024-08-01T05:59:09+5:30

शपथ सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी राज्यपालांना शुभेच्छा दिल्या.  

c p radhakrishnan take a oath of the new governor of maharashtra | सी. पी. राधाकृष्णन झाले महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी दिली शपथ

सी. पी. राधाकृष्णन झाले महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी दिली शपथ

लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी बुधवारी राज्यपालपदाची शपथ घेतली. राजभवन येथील दरबार हॉलमधील समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली. 

मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यपालांच्या नियुक्तीबाबतचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आदेश वाचून दाखवला. शपथ सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी राज्यपालांना शुभेच्छा दिल्या.  

राज्यपालांच्या पत्नी श्रीमती सुमथी आर., विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्रिमंडळ सदस्य, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

----००००----

Web Title: c p radhakrishnan take a oath of the new governor of maharashtra