BMC Election Results 2026 : BMC निकालाबाबत मोहित कंबोज यांचा मोठा दावा; ठाकरे गटाचं जोरदार प्रत्युत्तर, मांडली क्रोनोलॉजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 10:25 IST2026-01-16T10:23:56+5:302026-01-16T10:25:00+5:30
BMC Election Results 2026 : भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी मोठा दावा केला आहे. याला आता ठाकरे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

BMC Election Results 2026 : BMC निकालाबाबत मोहित कंबोज यांचा मोठा दावा; ठाकरे गटाचं जोरदार प्रत्युत्तर, मांडली क्रोनोलॉजी
मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. एकत्र आलेले ठाकरे बंधू महापालिकेवर झेंडा फडकविणार की भाजप-शिंदेसेना त्यांना धक्का देणार याबद्दल कमालीची उत्सुकता सर्वांना आहे. मुंबईच्या २२७ जागांसाठी ११४ हा बहुमताचा आकडा असून तो कोण गाठणार हे पुढील काही तासांत स्पष्ट होईल. याच दरम्यान भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी मोठा दावा केला आहे.
भाजपा मुंबईत १०० पेक्षा जास्त जागा जिंकेल असं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. याला आता ठाकरे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "क्रोनोलॉजी समजून घ्या. भाजपा निवडणुकीत पाण्यासारखा पैसा ओततो" असं म्हणत निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यावर उत्तर दिलं आहे.
क्रोनॉलॉजी समजून घ्या...
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) January 16, 2026
⚠️ भाजपा निवडणुकीत पाण्यासारखा पैसा ओततो...
⚠️ तेव्हा कंबोज अमेरिकेत असतो...
⚠️ मग कंबोज निवडणूकीच्या आधी भारतात येतो...
⚠️ भाजपाच्या विजयाचे आकडे देतो...
⚠️ तसेच एक्झिट पोल येतात...
⚠️ आणि तरीही जनमानस चिंतेत आणि फक्त कंबोजचा पक्ष आसुरी आनंदात असतो… https://t.co/H1z9Mv3e3n
"क्रोनॉलॉजी समजून घ्या... भाजपा निवडणुकीत पाण्यासारखा पैसा ओततो... तेव्हा कंबोज अमेरिकेत असतो... मग कंबोज निवडणुकीच्या आधी भारतात येतो... भाजपाच्या विजयाचे आकडे देतो... तसेच एक्झिट पोल येतात... आणि तरीही जनमानस चिंतेत आणि फक्त कंबोजचा पक्ष आसुरी आनंदात असतो!"
"हेच आपण पाहतोय... आणि निवडणूक निकालात हे कंबोजचे आकडे खरे ठरले तर 'कंबोज : अमेरिका : ईव्हीएम : भाजपा : अघोरी बहुमत' यांचा परस्परांशी काहीही संबंध आढळला तर तो महाराष्ट्र्राने योगायोग का समजावा? पण आता वाचा आणि निमूटपणे सहन करा!" असं अखिल चित्रे यांनी म्हटलं आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीची अंतिम टक्केवारी समोर आली आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मुंबईत एकूण ५२.९४ टक्के मतदान झालं आहे. २०१७ साली हिच आकडेवारी ५५.५३ टक्के इतकी होती. त्यामुळे यावेळी जवळपास अडीच टक्क्यांनी मतदान कमी झालं आहे.