“पालकमंत्री उदय सामंत कोकणातील शक्ती कपूर, सचिन वाझेचे भाऊ”; राणेंची शिवसेनेवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 11:50 AM2021-09-21T11:50:41+5:302021-09-21T11:53:34+5:30

अनेक मुद्द्यांवरून राणे आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत.

bjp nitesh rane slams shiv sena uddhav thackeray over chipi airport and medical collage | “पालकमंत्री उदय सामंत कोकणातील शक्ती कपूर, सचिन वाझेचे भाऊ”; राणेंची शिवसेनेवर टीका

“पालकमंत्री उदय सामंत कोकणातील शक्ती कपूर, सचिन वाझेचे भाऊ”; राणेंची शिवसेनेवर टीका

googlenewsNext
ठळक मुद्देअरविंद सावंत केंद्रात मंत्री असताना परवानग्या का नाही मिळाल्यादोन्ही प्रकल्प मार्गी कसे लागतील याचा विचार उदय सामंत यांनी करावानितेश राणे यांची टीका

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच शिवसेनेतील संघर्ष वाढताना पाहायला मिळत आहे. अनेक मुद्द्यांवरून राणे आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यात राणे पुत्रही मागे नाहीत. यातच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय कॉलेज व चिपी विमानतळावरुन पुन्हा एकदा शिवसेना व राणे आमनेसामने आले असून, पालकमंत्री उदय सामंत कोकणातील शक्ती कपूर असल्याची टीका राणेंनी केली आहे. (bjp nitesh rane slams shiv sena uddhav thackeray over chipi airport and medical collage)

“काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म, शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत”

भाजप आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट केले असून, यामध्ये एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये नितेश राणे यांनी शिवसेना आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पालकमंत्री उदय सामंत कोकणातील शक्ती कपूर आणि सचिन वाझे यांचे भाऊ असल्याची टीका नितेश राणे यांनी केली आहे. 

संरक्षण क्षेत्रात गुंतवणुकीची सुवर्ण संधी; महाराष्ट्रातील ‘या’ कंपनीचा IPO जाहीर, पाहा, डिटेल्स

नारायण राणे यांच्यामुळेच परवानगी

आमच्या कोकणाचे शक्ती कपूर व कोकणातील सचिन वाझेचे भाऊ सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दोन घोषणा केल्या. त्यातील एक म्हणजे कोकणात येणारे वैद्यकीय महाविद्यालय. या महाविद्यालयाबद्दल आम्हाला सर्व जणांना आनंद आहे. पण या महाविद्यालयाची परवानगी नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर मिळाली तर चीपी विमानतळासाठी विमानसेवा सुरू करण्याच्या परवानगीही नारायण राणेंमुळेच मिळाली, असा दावा नितेश राणे यांनी या व्हिडिओतून केला आहे. 

लहान मुलांसाठी संजीवनी! ‘या’ कंपनीची लस ठरणार अधिक प्रभावी, लवकरच मिळणार मंजुरी

तेव्हा तुम्हाला कशी परवानगी मिळाली नाही?

२०१४ ते २०१९ मध्ये तुमच्या शिवसेनेचे अरविंद सावंत हे केंद्रात मंत्री होते. तेही कोकणचे सुपुत्र आहेत. तेव्हा तुम्हाला कशी परवानगी मिळाली नाही, तेव्हा तर तुम्ही भाजपसोबत युतीत होतात. मग तरीही परवानगी कशी मिळाली नाही. राणे मंत्री झाल्यावर कशा परवानग्या मिळतात, अशी विचारणा करत केंद्र सरकारची मदत घेऊन हे दोन्ही प्रकल्प मार्गी कसे लागतील याचा विचार उदय सामंत यांनी करावा, असा सल्ला नितेश राणे यांनी यावेळी दिला. 

Web Title: bjp nitesh rane slams shiv sena uddhav thackeray over chipi airport and medical collage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.