BJP is losing the battle for our unity and has helplessly activated their B-Team says NCP Jayant Patil | 'आपण १५ कोटी ते १०० कोटी': भाजपाने 'बी टीम'ला अ‍ॅक्टिव्ह केलंय; राष्ट्रवादीचा टोला

'आपण १५ कोटी ते १०० कोटी': भाजपाने 'बी टीम'ला अ‍ॅक्टिव्ह केलंय; राष्ट्रवादीचा टोला

ठळक मुद्देजयंत पाटील यांनी भाजपा व एमआयएमवर निशाणा साधला आहे. भेदवादी वृत्तींपासूनही सतर्क रहावे असे आवाहन त्यांनी जनतेला केले.'भाजपाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे भाजपाने आपल्या बी टीमला अ‍ॅक्टिव्ह केले'

मुंबई - आपल्या एकतेच्या बळावर देशातील जनता सीएए, एनआरसीविरोधातील लढा लढत आहे. भाजपाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे आता भाजपाने आपल्या बी टीमला अ‍ॅक्टिव्ह केले आहे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपा व एमआयएमवर निशाणा साधला आहे. भेदवादी वृत्तींपासूनही सतर्क रहावे असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

“१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट “असं धार्मिक तेढ निर्माण करणारे वादग्रस्त वक्तव्य वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी एका जाहीर कार्यक्रमात केलं होतं. पठाण यांचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विशेष म्हणजे यावेळी मंचावर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची देखील उपस्थिती होती. याच प्रकरणावरून मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. 

पठाण यांच्या या वक्तव्यामुळे सर्वच स्तरावर पठाण यांचा निषेध व्यक्त केला आहे. प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर, अभिनेत्री स्वरा भास्कर आणि असंख्य विवेकवादी लोकांनी पठाण यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून जलयुक्त शिवार योजना ओळखली जाते. जयंत पाटील यांनी पुण्यामध्ये आज जलयुक्त शिवार योजनेवर भाष्य करत भूमिका मांडली आहे. 'जलसंधारणाची कामे चालू राहतील. जलयुक्त शिवार हे अनेक काम एकत्र करून दिलेलं गोंडस नाव होतं. काही तकलादू कामे झाली. अत्यंत सुमार कामे झाली त्याबद्दल आम्हीही तक्रार केली होती. श्वेतपत्रिका काढण्याचा विचार नाही.सगळ्या गोष्टी श्वेतपत्रिकेतून येतील असे नाही, वेगवेगळ्या पत्रिकेतून येतील' असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. 

राज्यात यापुढे ग्राम पंचायत सदस्यांमधून सरपंचांची निवड करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने घेतला होता. तत्कालीन फडणवीस सरकारचा थेट सरपंच निवड करण्याचा निर्णय रद्द केला होता. आता राज्यपालांनी महाविकास आघाडीच्या या नव्या निर्णयाला मोठा दणका दिला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या अध्यादेश काढण्यास नकार दिला आहे. याबाबत 'ग्रामविकास विभागाचा सरपंच निवडीच्या कायद्यातील बदल राज्यपालांना कळवला आहे. त्यांनी तो निर्णय घेतलेला नाही. त्यांनी विधीमंडळात कायदा मांडून मंजूर करावा असे सांगितले आहे. त्याप्रमाणे करू. त्यांच्याविषयी काही बोलायचं नसतं. त्यांचा सन्मान राखणे ही आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही पार पाडू' असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

'जलयुक्त शिवार हे नाव गोंडस, पण कामे सुमार झाली'; जयंत पाटलांनी भूमिका मांडली

राज्यपालांनी नाकारला सरपंच निवडीचा अध्यादेश; जयंत पाटील म्हणाले, 'जसा आपला आदेश!'

ओवेसींच्या मंचावर 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्या तरुणीला अटक

शिवसेना यूपीएत जाणार?; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सोनिया गांधींच्या भेटीला

China Coronavirus : 'कोरोना'चे तब्बल 2,236 बळी, जगभरात 75,000 पेक्षा जास्त लोकांना संसर्ग

राज्यपालांचा ठाकरे सरकारला दणका; सरपंच निवडीचा अध्यादेश काढण्यास नकार

 

English summary :
Due to ongoing and fearless democratic protests against the CAA and NRC, the BJP is losing the battle for our unity and has helplessly activated their B-Team. We urge people to be aware and avoid such inflammatory separatist ideology says NCP Jayant Patil

Web Title: BJP is losing the battle for our unity and has helplessly activated their B-Team says NCP Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.