आदर्श रिक्षाचालक बना

By Admin | Updated: June 1, 2015 22:27 IST2015-06-01T22:27:55+5:302015-06-01T22:27:55+5:30

प्रवाशांना चांगली सेवा देऊन आदर्श रिक्षाचालक बना, परिवहन विभाग तुमच्या पाठीशी आहे असा सल्ला राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कल्याणात दिला.

Become an ideal rickshaw driver | आदर्श रिक्षाचालक बना

आदर्श रिक्षाचालक बना

कल्याण : प्रवाशांना चांगली सेवा देऊन आदर्श रिक्षाचालक बना, परिवहन विभाग तुमच्या पाठीशी आहे असा सल्ला राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कल्याणात दिला. सोमवारपासून शहरात प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्यात आली. त्याचा शुभारंभ रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
रिक्षा चालक-मालक संघटना आणि कल्याण आरटीओ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ही प्रीपेड सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेच्या शुभारंभ प्रसंगी रावते यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार गणपत गायकवाड, परिवहन आयुक्त सोनिया सेठी, केडीएमसी आयुक्त मधुकर अर्दड, तहसिलदार किरण सुरवसे, ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक, रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पेणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मीटर रिक्षाच्या वाढत्या तक्रारी पाहता याला पर्याय म्हणून प्रीपेड सेवा सुरू करण्यात आल्याचे रावते म्हणाले. या पर्यायाची राज्यातील सर्वच शहरांत अंमलबजावणी केली जाणार असून ही सेवा प्रवाशांसाठी सोयीची ठरणारी असल्याचा दावा त्यांनी केला. राज्यात लवकरच परिवहन कायदा अस्तित्वात येणार असून कायद्याचे पालन करा, सुरक्षित रहा असा सल्ला त्यांनी रिक्षाचालकांना दिला. या शुभारंभ सोहळयात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रामाणिक रिक्षाचालकांना गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Become an ideal rickshaw driver