जिल्ह्यात ४४ शाळा अनधिकृत

By Admin | Updated: May 31, 2015 22:40 IST2015-05-31T22:40:31+5:302015-05-31T22:40:31+5:30

जिल्ह्यातील अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी जाहीर झाली असून यंदा ४४ अनधिकृत शाळा असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये सर्वाधिक शाळा नवी मुंबईत

44 schools unauthorized in the district | जिल्ह्यात ४४ शाळा अनधिकृत

जिल्ह्यात ४४ शाळा अनधिकृत

ठाणे : जिल्ह्यातील अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी जाहीर झाली असून यंदा ४४ अनधिकृत शाळा असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये सर्वाधिक शाळा नवी मुंबईत असून त्यापाठोपाठ ठाण्यात शाळा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे मान्यताप्राप्त शाळांमध्येच पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केले.
शासनाच्या वतीने एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी विविध स्तरांवर अनेक उपक्र म मोठ्या प्रमाणात हाती घेतले आहेत. त्यातच, मान्यता नसतानाही अधिकृतपणे अनेक शाळा मोठ्या दिमाखात सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यातच अशा शाळांवर शिक्षण विभागाकडून वेळोवेळी कारवाईदेखील केली आहे. मात्र, अशा शाळांवर कारवाई केल्यानंतर बऱ्याचदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षदेखील वाया जाते.
आपल्या पाल्याने चांगल्या शाळेत शिक्षण घ्यावे, असे सर्वच पालकांना वाटते. त्यासाठी पालक मोठ्या प्रमाणात डोनेशनदेखील भरतात. परंतु, ती शाळा अधिकृत आहे की नाही, याची खात्रीही करीत नाही. त्यामुळे मान्यताप्राप्त शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून केले आहे.

Web Title: 44 schools unauthorized in the district