या आठवड्यात बँकांना ४ दिवस सुट्या

By Admin | Updated: February 20, 2017 03:36 IST2017-02-20T03:36:33+5:302017-02-20T03:36:42+5:30

राज्यातील बँकांना २० ते २६ फेब्रुवारीदरम्यान ४ दिवस सुट्टी आहे. परिणामी आठवड्यातील उरलेल्या तीन दिवसांत बँकेची कामे ग्राहकांना

4 days to the banks this week | या आठवड्यात बँकांना ४ दिवस सुट्या

या आठवड्यात बँकांना ४ दिवस सुट्या

मुंबई : राज्यातील बँकांना २० ते २६ फेब्रुवारीदरम्यान ४ दिवस सुट्टी आहे. परिणामी आठवड्यातील उरलेल्या तीन दिवसांत बँकेची कामे ग्राहकांना करावी लागणार आहेत. त्यामुळे बँकांमध्ये तोबा गर्दी उसळण्याची शक्यता आहे.
या आठवड्यात सोमवारी कामकाजासाठी उघडलेल्या बँकांना मुंबईसह राज्यात मंगळवारी, २१ फेब्रुवारीला मतदानानिमित्त सुट्टी देण्यात आली आहे. पुन्हा बुधवार आणि गुरुवार हे २ दिवस बँका सुरु राहतील. त्यानंतर शुक्रवारी, २४ फेब्रुवारीला असलेल्या महाशिवरात्रीच्या सार्वजनिक सुट्टीसोबतच चौथा शनिवार आणि रविवारनिमित्ताने सलग तीन दिवस बँका बंद असतील. त्यामुळे या आठवड्यात अतिमहत्त्वाची कामे असतील, तरच ग्राहकांनी सोमवारी, बुधवारी आणि गुरुवारी बँकेत येण्याचे आवाहन प्रशासनाने  केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 4 days to the banks this week