प्लॅटफॉर्म विस्तारासाठी ‘सेंट्रल’वर १० तासांचा ब्लॉक; ठाणे, डोंबिवली स्थानकांवर रविवारी प्रवासखोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 10:55 IST2026-03-21T10:54:19+5:302026-03-21T10:55:07+5:30

असे असतील ब्लॉकचे परिणाम   ब्लॉक कालावधीत कल्याणवरून सुटणाऱ्या धीम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे ठाकुर्ली व कोपर येथे थांबा नसणार. पुढे दिवा-ठाणेदरम्यान पुन्हा धीम्या मार्गावर आणल्या जातील. ठाणे-मुलुंडदरम्यानही काही गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. 

10-hour block at Central for platform expansion; Travel disruption at Thane, Dombivli stations on Sunday | प्लॅटफॉर्म विस्तारासाठी ‘सेंट्रल’वर १० तासांचा ब्लॉक; ठाणे, डोंबिवली स्थानकांवर रविवारी प्रवासखोळंबा

प्लॅटफॉर्म विस्तारासाठी ‘सेंट्रल’वर १० तासांचा ब्लॉक; ठाणे, डोंबिवली स्थानकांवर रविवारी प्रवासखोळंबा

मुंबई : मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर १५ डब्यांच्या लोकल थांबणे साेयीचे व्हावे या दृष्टीने ठाणे व डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी शनिवारी रात्री १२ वाजल्यापासून रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत विशेष  ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी अनेक लोकल रद्द राहणार आहेत. काही लोकल धीम्या मार्गाऐवजी जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. 

असे असतील ब्लॉकचे परिणाम   ब्लॉक कालावधीत कल्याणवरून सुटणाऱ्या धीम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे ठाकुर्ली व कोपर येथे थांबा नसणार. पुढे दिवा-ठाणेदरम्यान पुन्हा धीम्या मार्गावर आणल्या जातील. ठाणे-मुलुंडदरम्यानही काही गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. 

डोंबिवली गाड्या रद्द -
ब्लॉक कालावधीत डोंबिवली येथे सुरू/समाप्त होणाऱ्या सर्व गाड्या रद्द. ब्लॉक कालावधीत मुलुंड-ठाणे आणि दिवा-कल्याण दरम्यान अप/डाउन सर्व उपनगरीय सेवा रद्द. शनिवारी रात्री उशिरा सुरू होणाऱ्या गाड्यांपासून ते रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंतच्या काही सेवांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 

 या कालावधीत कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या गाड्यांना अप जलद मार्गावर वळवण्यात येणार असून, त्या पुढे ठाणे-मुलुंडदरम्यान पुन्हा धीम्या मार्गावर आणल्या जातील, अशी माहिती देण्यात आली. 

मेल-एक्स्प्रेस मार्गिका बदल -
ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादरहून सुटणाऱ्या डाउन मेल व एक्सप्रेस गाड्या विद्याविहार/
ठाणे ते कल्याणदरम्यान पाचव्या मार्गावरून चालवण्यात येतील. 
तसेच अप दिशेने येणाऱ्या गाड्यांना कल्याण-ठाणे/विद्याविहारदरम्यान सहाव्या मार्गावरून वळवण्यात येणार आहे.

Web Title : सेंट्रल रेलवे का प्लेटफार्म विस्तार; ठाणे, डोंबिवली में यात्री परेशान

Web Summary : सेंट्रल रेलवे रविवार को ठाणे और डोंबिवली स्टेशनों पर प्लेटफॉर्म विस्तार के लिए 10 घंटे का ब्लॉक करेगा। कई लोकल ट्रेनें रद्द रहेंगी और कुछ को फास्ट ट्रैक पर डायवर्ट किया जाएगा। यात्रियों को परेशानी हो सकती है, इसलिए योजना बनाकर चलें।

Web Title : Central Railway to Block Platforms; Thane, Dombivli Passengers Face Disruptions

Web Summary : Central Railway will conduct a 10-hour block for platform expansion at Thane and Dombivli stations on Sunday. Many local trains will be cancelled, and some will be diverted via the fast track. Passengers should expect disruptions and plan accordingly.