Join us
Daily Top 2Weekly Top 5

'फर्स्ट क्लासने प्रवास करेन असं कधीच वाटलं नव्हतं; सिद्धार्थने दिला जुन्या आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 18:05 IST

Siddharth jadhav: उत्तम अभिनयशैली आणि स्वभावातील साधेपणा यामुळे सिद्धार्थ कायम प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतो.  सध्या तो त्याच्या एका जुन्या आठवणीमुळे चर्चेत येत आहे.

मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा डंका वाजणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव.  उत्तम अभिनयशैली आणि स्वभावातील साधेपणा यामुळे सिद्धार्थ कायम प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतो.  सध्या तो त्याच्या एका जुन्या आठवणीमुळे चर्चेत येत आहे. सिद्धार्थ लवकरच हे तर काहीच नाही या कार्यक्रमात झळकणार आहे. या निमित्ताने त्याने त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देत एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर सिद्धार्थचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ त्याच्या स्ट्रगल काळातील एक किस्सा सांगताना दिसत आहे. आयुष्यात कधी फर्स्ट क्लासने प्रवास करेन असं वाटलं नव्हतं, असं म्हणत त्याने रेल्वेतील टीसीची कशी खिल्ली उडवली होती हे सांगितलं आहे. 

"मी कधी फर्स्ट क्लासने प्रवास करेन असा विश्वास मलाही कधी नव्हता. पण मी केला. फर्स्ट क्लासचा पास काढला होता आणि त्या डब्ब्यातून प्रवास करत होतो. याच वेळी एक टीसी ट्रेनमध्ये चढला आणि त्याने मला पाहिलं. आता त्याने मला पाहिलंय हे माझ्या लक्षात आलं होतं. पण मी मुद्दाम त्यांच्यासमोर अॅक्टींग करायला लागलो की, मी चुकून या डब्ब्यात चढलो, माझ्याकडे तिकीट नाहीये. मुद्दाम मी चोरासारखा वागत होतो. हळूहळू दादर सुटलं आणि एलफिस्टिन स्टेशन आलं तसं मी जास्तच अॅक्टींग करायला लागलो. यात जशी ट्रेन स्टेशनवर थांबली मी ब्रीजवरुन जोरात धावायला लागलो", असं सिद्धार्थ म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "मला पळतांना पाहून त्या टीसीने ज्या दोघां-तिघांना पकडलं होतं त्यांना सोडून दिलं आणि माज्या मागे धाावयला लागला. त्यानंतर एका पॉईंटला मी धावता-धावता अचानक थांबलो आणि टीसी पण माझ्यासमोर येऊन थांबला. आणि म्हणाला, क्या हैं..तिकीट दिखाओ फर्स्ट क्लास का..त्याचं हे वाक्य ऐकल्यावर मी त्याला माझा पास दाखवला. माझं हे नाटक त्याची रिअॅक्शन अशी होती की, अरे यार पहिले बोलना था ना. मैंने उन लोगों को छोड दिया."

दरम्यान, कोणालाच वाटलं नव्हतं मी फर्स्ट क्लासने प्रवास करेन. पण मी केला होता. आणि, अशाच अनेक घटना दररोज घडत असतात, असं म्हणत सिद्धार्थने त्याचा मजेशीर किस्सा शेअर केला. 

टॅग्स :सिद्धार्थ जाधवसिनेमासेलिब्रिटी