बोरीवलीत उभी राहते मिनी धारावी! दिवसा ढवळ्या उभारल्या 60 ते 70 पक्क्या झोपड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 07:45 PM2021-06-17T19:45:46+5:302021-06-17T19:46:19+5:30

बोरीवली पश्चिम भिमनगर गल्ली नं ३ च्या पाठीमागे नाल्यामध्ये भरणी टाकून सुमारे 60 ते 70 पक्क्या नवीन अनधिकृत झोपड्यांचे बांधकाम सध्या येथे राजरोसपणे सुरू चालू आहे.  

mini dharavi stands in Borivali 60 to 70 pucca huts erected during the day | बोरीवलीत उभी राहते मिनी धारावी! दिवसा ढवळ्या उभारल्या 60 ते 70 पक्क्या झोपड्या

बोरीवलीत उभी राहते मिनी धारावी! दिवसा ढवळ्या उभारल्या 60 ते 70 पक्क्या झोपड्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: एकीकडे दहिसर पश्चिम गणपत पाटील नगर मध्ये गेल्या दशकात मिनी धारावी वसली असतांना, आता बोरीवलीच्या पश्चिमेला नाल्यात सरकारी जागेवर मिनी धारावी उभी राहत आहे. बोरीवली पश्चिम भिमनगर गल्ली नं ३ च्या पाठीमागे नाल्यामध्ये भरणी टाकून सुमारे 60 ते 70 पक्क्या नवीन अनधिकृत झोपड्यांचे बांधकाम सध्या येथे राजरोसपणे सुरू चालू आहे.  

बोरिवलीच्या भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा रेश्मा निवळे आणि नगरसेविका अंजली खेडकर यांच्याकडे  यासंदर्भात वारंवार तक्रारी येत होत्या. त्यांनी काल स्ट्रिंग ऑपरेशन करून धाडसाने घटनास्थळी धाव घेतली आणि सदर बांधकाम रोखले.

सदर बाब त्यांनी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी आणि बोरिवली विधानसभा क्षेत्राचे  आमदार  सुनील राणे यांना सांगताच त्यांनी सदर जागेची पाहणी करण्याची सूचना केली तसेच पालिका अधिकाऱ्यांना सूद्धा सूचित केले.

याठिकाणी रेश्मा निवळे, नगरसेविका अंजली खेडकर  गेल्यावर जवळजवळ ६० ते ७० पक्क्या  झोपड्या तयार  तयार झाल्याचे व अजूनही नाल्यात भरणी टाकत असल्याचे त्यांनी दिसून आले. त्या दोघींनी जोरदार विरोध करुन सदर काम थांबवले. तर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी येथे बनत असलेल्या मिनी धारावीचा आखो देखा का हाल पेश केला.

याप्रकरणी खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की, जर खाजगी जागेवर 2 फूट बांधकाम केले तर महापालिका ते तोडते आणि मग सरकारी जागेवर राजरोसपणे उभ्या राहणाऱ्या झोपड्यांकडे महापालिका मात्र दुर्लक्ष करते. यावरून नागरिकांनी काय ते समजून जावे असा टोला त्यांनी लगावला.

याप्रकरणी आमदार सुनील राणे यांच्याशी संपर्क साधल्यावर,पूर्वी चार बाबू आणि त्यावर ताडपत्री टाकून
 उभारलेली झोपडी असे म्हंटले जात होते,मात्र या ठिकाणी विटांचे  सरकारी जागेवर पक्के बांधकाम करून झोपड्या उभ्या राहतात. याकडे पालिका प्रशासन,तलाठी व उपनगर जिल्ह्याधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून त्यांनी दुर्लक्ष केले आहे.उद्या जर येथे दुर्घटना घडल्यास आणि पूरर्जन्य 
परिस्थिती निर्माण झाल्यास कोण जबाबदार असा सवाल त्यांनी केला.

याप्रकरणी झोपडपट्टी दादांवर एमआरटीपी लावून गून्हा दाखल करावा व सदर बांधकाम ताबडतोब निष्कासित करावे असे आपण आर मध्य वॉर्डच्या  वार्ड आफिसर डॉ. भाग्यश्री कापसे यांना कळवले आहे.  पालिका अधिकाऱ्यांचा वरदहस्त मिळाल्यानेच सदर पक्की बांधकामे येथे सुरू असून गोराई चारकोप येथील पाणी या अनधिकृत झोपड्यांना पूरवले जाते. त्यामूळेच चारकोप गोराई म्हाडा सोसायट्यांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागते असे मत त्यांनी व्यक्त केले.
 

Web Title: mini dharavi stands in Borivali 60 to 70 pucca huts erected during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.