Join us
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टाग्रामनंतर 70 वर्षीय 'या' बोल्ड अभिनेत्रीचं OTT मध्येही पदार्पण, जुन्या फोटोंमुळे पुन्हा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 12:36 IST

देव आनंदसोबतच्या 'हरे कृष्णा' या सिनेमामुळे त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली.

Zeenat Aman :  ७० ते ८० च्या दशकात बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री झीनत अमान. त्याकाळातही झीनत अमान यांनी आपल्या बोल्डनेसने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. मधला बराच काळ झीनत अमान लाईमलाईटपासून दूर होत्या. मात्र आता नुकतेच त्या इन्स्टाग्रामवर आल्या आहेत. आपले जुने फोटो शेअर करत त्या आठवणींना उजाळा देत आहेत. आता झीनत अमान पुन्हा अभिनयात कमबॅक करत आहेत. 

ओटीटी माध्यमातून करणार डेब्यू

ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी १९७० मध्ये 'द इव्हिल विदिन' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. देव आनंदसोबतच्या 'हरे कृष्णा' या सिनेमामुळे त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली. यानंतर त्यांनी एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले. त्यांचे बॉलिवूडमधील योगदान खूप मोठे आहे. आता झीनत अमान ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. 'शोस्टॉपर' (Showstopper) या वेबसिरीजमधून त्या ओटीटीमध्ये पदार्पण करत आहेत.

'शोस्टॉपर' या वेबसिरीजचे दिग्दर्शन मनीष हरिशंकर करणार आहेत. झीनत अमान यांना नुकतेच दिग्दर्शकासोबत स्क्रीप्ट वाचताना बघितले गेले. या सिरीजमध्ये झीनत अमान यांच्यासोबतच श्वेता तिवारी, रोहित रॉय, जरीना वहाब यांच्याही भूमिका आहेत. 

झीनत अमान यांनी १३ जानेवारी रोजी इन्स्टाग्रामवर डेब्यू केला. त्यांनी जुन्या काळातील अनेक फोटो शेअर केले. त्यांच्या पहिल्या बोल्ड फोटोमागची कहाणीही त्यांनी सांगितली. सध्या त्या या फोटोंमुळे सतत चर्चेत आहेत. 

'सत्यम शिवम सुंदरम', 'डॉन', 'हरे राम हरे कृष्णा', 'कुर्बानी', 'लावारिस', 'द ग्रेट गॅम्बलर', 'रोटी कपडा' और 'मकान' अशा अनेक सिनेमांमध्ये काम केले. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेश खन्ना, फिरोज खान या सर्व आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केले. मात्र त्यांची ओळख कायम एक बोल्ड अभिनेत्री अशीच राहिली.

टॅग्स :झीनत अमानसोशल मीडियासिनेमाव्हायरल फोटोज्