Join us
Daily Top 2Weekly Top 5

लाटांसमोर शांतपणे उभी होती सोनाक्षी, अचानक पतीने पाण्यात ढकललं अन्... VIDEO पाहून तुम्हीही हसाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 12:50 IST

सोनाक्षी फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत असते.

बॉलिवूडची 'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा हिनं अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण, सोनाक्षी फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत असते. काही दिवसांपुर्वीच सोनाक्षीनं तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न केलं आहे. लग्न झाल्यापासून सोनाक्षी आणि तिचा पती झहीर हे त्यांच्या मस्तीखोर स्वभावामुळे कायम चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. सोशल मीडियावर ते फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सध्या सध्या झहीर आणि सोनाक्षी हे ऑस्ट्रेलियात सुट्टी घालवत आहेत. अलीकडेच या जोडप्यानं एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये झहीरची खोडकर बाजू पाहायला मिळतेय. यात सोनाक्षी ही समुद्रकिनारी उभी राहून लाटांचा आनंद लुटताना दिसतेय. तर मात्र, तिचा पती झहीर हळूच तिच्या जवळ जातो आणि पाठीमागून धक्का देत पाण्यात ढकलतो. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी भरभरून कमेंटस् केल्या आहेत.

 

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी 7 वर्षांहून अधिक काळ डेटिंग केल्यानंतर 23 जून 2024 रोजी लग्न केलं. सोनाक्षी आणि जहीरने 2017 मध्ये डेट करायला सुरुवात केली होती. दोघे 2022 मध्ये 'डबल एक्सएल' चित्रपटात दिसले होते. सोनाक्षी सिन्हा अखेरची संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या वेबसिरीजमध्ये फरीदानची भूमिका साकारताना दिसली होती. सध्या दोघांचा सुखाचा संसार सुरू असून ते एकत्र खूप आनंदी आहेत.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हाआॅस्ट्रेलियासेलिब्रिटी