Join us

'या' लोकप्रिय युट्यूबरला आलिया भटसोबत करायचं होतं लग्न, पॉडकास्टमध्ये केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 12:45 IST

या युट्यूबरला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तो नेहमीच चर्चेत असतो.

अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहे. ती तिच्या अभिनयाने आणि अदांनी प्रेक्षकांना घायाळ करत आली आहे. तिच्या कामाबरोबरच ती नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. आलियाने अभिनेता रणबीर कपूरसोबत २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. करिअर यशाचे शिखरावर होते तेव्हा तिने लग्नाचा निर्णय घेतला.  लग्नाच्या वर्षभरानंतर त्यांना कन्यारत्न सुद्धा झालं. अभिनेत्रीचा सध्या सुखाचा संसार सुरू आहे. पण, जेव्हा अभिनेत्रीनं लग्न केलं. तेव्हा अनेक चाहत्यांचं हृदय तुटलं होतं. या चाहत्यांच्या यादीत युट्यूबर एल्विश यादवदेखील (Youtuber Elvish Yadav) होता.

अलीकडेच रिअलिटी शो 'नागिन' स्टार आणि फिटनेस ट्रेनर प्रतीक सहजपाल हा युट्यूबर एल्विश यादवच्या पॉडकास्टवर पाहुणा म्हणून आला होता. यावेळी युट्यूबरने प्रतीकला त्याच्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल विचारलं असता  त्याने आलिया भट हिचं नाव घेतलं.  यावर एल्विश यादवने त्यालाही आलिया आवडत असल्याचं म्हटलं. तसेच आता आलियाचं लग्न झालं असून तिला मुलगीही आहे, असं तो म्हणाला. यावर 'आपल्या कुठे तिच्याशी लग्न करायचं होतं', असं प्रतिक म्हणतो. यावर 'मला तर तिच्याशी लग्न करायचं होतं' असं एल्विशने म्हटलं. यानंतर रणबीर कपूरची माफी मागत तो म्हणतो 'उगाच हा विषय काढला'. 

युट्यूबर एल्विश यादवला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तो नेहमीच चर्चेत असतो. एल्विश यादवच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो सध्या 'लाफ्टर शेफ्स अनलिमिटेड एंटरटेनमेंट सीझन २' आणि 'एमटीव्ही रोडीज डबल क्रॉस' मध्ये पाहायला मिळतोय.  त्याचं स्वतःचं YouTube चॅनेल देखील आहे, ज्यावर तो सेलिब्रिटी पाहुण्यांना आमंत्रित करतो आणि त्यांच्याशी गप्पा मारतो.  

टॅग्स :आलिया भटयु ट्यूबसोशल मीडिया