Join us

यूट्यूबर एल्विश यादवची संपत्ती ईडीने केली जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 09:03 IST

मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून ईडीने त्यांची मालमत्ता जप्त केली

लखनौ : यूट्यूबर सिद्धार्थ यादव उर्फ एल्विश यादव आणि काही इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून ईडीने त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. यादव याने आयोजित केलेल्या पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाचा मादक पदार्थ म्हणून वापर केल्याच्या व आर्थिक व्यवहाराशी संबंधित प्रकरणात ईडीने त्यांची चौकशी केली.

एल्विशशी संबंध असलेला हरयाणाचा गायक राहुल यादव  याचीही ईडीने चौकशी केली होती. रेव्ह किंवा मनोरंजन पार्ट्यांचे आयोजन करण्यासाठी बेकायदेशीर निधीचा कथित वापर याची इडीकडून चौकशी सुरू आहे.  

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालय