Join us

Armaan Malik : युट्युबर अरमान मलिकचा गायकावर पलटवार, म्हणाला, 'जसे लोक तसे उत्तर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 16:24 IST

युट्युबर अरमान मलिकचे गायकाला उत्तर

दोन पत्नी असलेला युट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. विशेष म्हणजे त्याच्या दोन्ही पत्नी एकाच वेळी गरोदरही आहेत. यामुळे त्याला प्रचंड ट्रोलही केले जात आहे. पण या सर्व प्रकारामुळे बॉलिवूड गायक अरमान मलिक संतापला आहे. त्याने सोशल मीडियातून नाराजीही व्यक्त केली आहे. तर त्याच्या नाराजीवर युट्यूबर अरमान मलिकने उत्तर दिलं आहे. दोघांची सोशल मीडियावर चांगलीच जुंपली आहे.

गायक अरमान मलिकने ट्वीट करत लिहिलं, 'त्याला अरमान मलिक म्हणणं बंद करा, त्याचं खरं नाव संदीप आहे. खूप झालं आता माझ्या नावाचा इतका दुरुपयोग होणं . सकाळी उठल्यावर अशा बातम्या वाचून अस्वस्थ वाटतं.' 

अरमानने हे ट्वीट २४ फेब्रुवारीला केलं आहे. त्याच्या या ट्वीटवर युट्यूबर अरमान मलिक व त्याच्या पत्नींनी उत्तर दिलं. 'माझ्या नवऱ्याची लहानपणापासून दोन नावं आहेत. प्रसिद्ध होण्याआधीही लोक त्यांना याच नावाने ओळखत होते', असं युट्यूबर अरमान मलिकची पहिली पत्नी पायलने म्हटलं होतं. 

तर आता युट्युबर अरमान मलिक म्हणतो, 'मी तुमच्या नावाचा गैरवापर केलेला नाही. जगात करोडो अरमान मलिक आहेत. माझ्या जवळच्या लोकांना चांगलंच माहित आहे की माझं दुसरं नाव संदीप आहे. त्यांना ही गोष्ट सांगण्याची गरज नाही. आम्ही तुमची गाणी ऐकली आहेत. आम्ही अनु मलिकचे फॅन आहोत. म्हणून आमचे तुमच्यावरही प्रेम आहे. तुम्ही माझ्यापेक्षा ५ वर्षांनी लहान आहात. तुमची किळसवाणी गोष्ट मला अजिबात पटलेली नाही.'

त्याच्या या प्रतिक्रियेवर गायक अरमान मलिकने अद्याप काही उत्तर दिलेले नाही. मात्र युट्युबर अरमान मलिकने माफी न मागता उलट गायक अरमान मलिकवरच पलटवार केलेला दिसतोय. 

टॅग्स :अरमान मलिकसोशल मीडियायु ट्यूबट्रोल