मराठी कलाविश्वातील गुणी अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे (mukta barve). आपल्या उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर मुक्ताने असंख्य चाहत्यांची मनं जिंकली आहेत. चित्रपट, मालिका, नाटक अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी मुक्ता सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. बऱ्याचदा मुक्ता तिचे सेटवरील फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. परंतु, यावेळी मात्र तिने तिच्या बेस्ट फ्रेंडसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
काही दिवसांपूर्वीच अभिनेता संदिप पाठक याने एक नवीन कोरी कार खरेदी केली. या आनंदाच्या क्षणाचे काही फोटो त्याने सोशल मीडियावरही शेअर केले होते. त्यानंतर आता मुक्ताने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुक्ता संदिप पाठकसोबत त्याच्या नव्या कारमध्ये बसल्याचं दिसून येत आहे. मात्र, या पोस्टला तिने दिलेलं कॅप्शन लक्ष वेधणारं आहे.
"तुमचा सख्खा दोस्त जेव्हा त्याची ड्रीम कार घेतो तेव्हा जास्त शायनींग तुम्हीच मारता", असं कॅप्शन मुक्ताने या व्हिडीओला दिलं आहे. दरम्यान, तिच्या या कॅप्शन आणि व्हिडीओमधून संदिप आणि तिची किती चांगली मैत्री आहे हे दिसून येतं. सध्या मुक्ता अजुनही बरसात आहे या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.