Join us
Daily Top 2Weekly Top 5

'यंदा कर्तव्य आहे' फेम अभिनेत्री सध्या काय करते? १४ वर्षांनंतर इतकी बदलली की तुम्ही ओळखणारही नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 16:14 IST

'यंदा कर्तव्य आहे' सिनेमातून अभिनेत्री स्मिता शेवाळेला प्रसिद्धी मिळाली.

'यंदा कर्तव्य आहे' हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय सिनेमांपैकी एक आहे. अरेंज मॅरेज झालेल्या आणि हनिमूनला गेलेल्या एका गोड कपलची हलकी फुलकी लव्हस्टोरी  या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सिनेमातील आभास हा हे गाणंही प्रचंड लोकप्रिय ठरलं. अंकुश चौधरी आणि स्मिता शेवाळे ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळाली. 'यंदा कर्तव्य आहे' सिनेमामुळे स्मिता शेवाळेला प्रसिद्धी मिळाली. 

आज या सिनेमाला १४ वर्ष पूर्ण झाली आहे. २००६ साली २० एप्रिलला 'यंदा कर्तव्य आहे' सिनेमा प्रदर्शित झाला होता. केदार शिंदेंचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा आजही तितक्याच आवडीने पाहिला जातो. या सिनेमामुळे प्रसिद्धी मिळालेली स्मिता शेवाळे सध्या काय करते? हे तुम्हाला माहीत आहे का? १४ वर्षांत अभिनेत्री इतकी बदलली की आता तिला तुम्ही ओळखणारही नाही. 'यंदा कर्तव्य आहे' सिनेमानंतर स्मिता अनेक चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारताना दिसली. आलटून पालटून, मन्या सज्जना, घे डबल, मेनका उर्वशी, सर्व लाइन व्यस्त आहेत, चल लव कर, लाडी गोडी या सिनेमांमध्ये ती झळकली. सुभेदारसारख्या सिनेमात तिने ऐतिहासिक भूमिकादेखील उत्तमरित्या साकारली.

चित्रपटांबरोबरच स्मिताने अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. स्मिता सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या मालिकेतून ती प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमाटिव्ही कलाकार