Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेवंताचा नो मेकअप लूकमधील फोटो पाहिलात का?, ही आहे फोटोची खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 10:18 IST

अपूर्वाला अभिनयात कुठलाही रस नव्हता.

रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने जशी प्रेक्षकांची मनं जिंकलीत, तसेच या मालिकेतील कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. शेवंता आणि अण्णांच्या अदाकारीचे तर चाहते डाय हार्ट फॅन बनलेत. शेवंताची एन्ट्री झाल्यानंतर मालिकेची लोकप्रियता आणखीच वाढली. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे. या मालिकेतून लोकप्रियता मिळाल्यानंतर अपूर्वाच्या चाहत्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. अपूर्वा हिने नो मेकअप लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. विना मेकअप लूक असला तरी तिच्या फोटोवर चांगली दिसत असल्याच्या कमेंट्स येत आहेत. विशेष म्हणजे हा फोटो अपूर्वाने रात्रीस खेळ चालेच्या सेटवरच काढला आहे कारण फोटोत तिच्या मागे नाईकांचा वाडा दिसतो आहे. 

२७ डिसेंबर १९८८ रोजी मुंबईच्या दादर येथे जन्मलेल्या अपूर्वाने किंग जॉज विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर नॅशनल कॉलेज वांद्रे आणि रूपारेल कॉलेजात तिचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले.

कॉलेजमध्ये असतानाच अपूर्वाला अ‍ॅक्टिंगच्या ऑफर येणे सुरु झाले होते. पण अपूर्वाने या सगळ्या ऑफर धुडकावल्या होत्या. याचे कारण म्हणजे, अभिनयात तिला कुठलाही रस नव्हता. खरे तर तिला एमबीए करायचे होते. पण अपूर्वाच्या आई-वडिलांची मात्र मुलीने अभिनयात जावे अशी इच्छा होती. नियतीने त्यांची ही इच्छा पूर्ण केली. कदाचित त्यामुळेच, अभिनय क्षेत्रात काम करणे हे माझ्या नशिबातच लिहिले होते, असे अपूर्वा नेहमी म्हणते.

टॅग्स :अपूर्वा नेमळेकररात्रीस खेळ चालेझी मराठी