Join us
Daily Top 2Weekly Top 5

रितेश देशमुख राजकारणात एन्ट्री करणार?, यावर अभिनेता म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 13:37 IST

बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सातत्याने चर्चेत येत असते. त्याने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सातत्याने चर्चेत येत असते. त्याने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. रितेशचा खूप मोठा फॅन फॉलोव्हिंग आहे. त्याच्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या वेड या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नुकतेच रितेश देशमुखने एका कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी रितेशने विविध विषयांवर चर्चा केली. या कार्यक्रमात रितेशला 'राजकारणात एन्ट्री करणार का?' असे विचारण्यात आले. यावर रितेशने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.

एका कार्यक्रमात रितेशला विचारण्यात आले की, 'तुझे प्रेम कशावर आहे, राजकारण की सिनेमा?' या प्रश्नाचे उत्तर देत रितेश म्हणाला की, राजकारण. पुढे रितेशला विचारण्यात आले की, तुला राजकारणात एन्ट्री करायची आहे का? यावर रितेश म्हणाला, 'राजकारणात यायचे आहे असं मी म्हणालो नाही पण राजकारण हे माझे पहिले प्रेम आहे. राजकारणाविषयी माझी आवड आणि आपुलकी आहे. ' रितेशचे उत्तर ऐकून पुढे विचारण्यात आले की, 'म्हणजे तू कधी राजकारणात जाणार नाहीस?' त्यावर रितेश म्हणाला, 'भविष्यात काय होईल काहीच माहित नसतं.'

अभिनेता रितेश देशमुखनं तुझे मेरी कसम या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मस्ती, क्या कूल है हम, हे बेबी, धमाल, हाऊसफुल्ल, एक व्हिलन यांसारख्या चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका केली. तसेच त्याच्या माऊली, लय भारी या मराठी चित्रपटांना देखील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. रितेशचा वेड हा चित्रपट ३० डिसेंबरला रिलीज झाला. या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी कोट्यवधींची कमाई केली. 

टॅग्स :रितेश देशमुखवेड चित्रपट