Join us

'पुष्पा ३'मध्ये दिसणार का आंचल मुंजाल?, म्हणाली - "रोल कापल्यामुळे निराश होती, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 11:59 IST

Pushpa 2 Movie : अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहद फासिल सारख्या कलाकारांनी 'पुष्पा २' मध्ये भूमिका केल्या होत्या, परंतु आंचल मुंजाल देखील छोट्या भूमिकेत दिसली होती.

अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा-द रुल' (Pushpa The Rule) ५ डिसेंबर २०२४ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. अजूनही हा चित्रपट चर्चेत आहे आणि २०२४ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील बनला आहे. आता चाहते त्याच्या OTT रिलीजची वाट पाहत आहेत. दरम्यान, 'पुष्पा ३' (Pushpa 3 Movie) बद्दल नवीन अपडेट्स देखील समोर येत आहेत. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहद फासिल सारख्या कलाकारांनी 'पुष्पा २' मध्ये भूमिका केल्या होत्या, परंतु आंचल मुंजाल (Aanchal Munjal) देखील छोट्या भूमिकेत दिसली होती. अशा परिस्थितीत आंचल मुंजाल 'पुष्पा ३' मध्ये दिसणार की नाही, याबद्दल आंचलने खुलासा केलाय.

आंचल मुंजाल मालदीवमध्ये 'पुष्पा २' चित्रीकरणाच्या एका भागात दिसली होती. आता 'पुष्पा ३' मधील तिच्या भूमिकेबद्दल विचारले असता, आंचल म्हणाली, मला खात्री नाही की 'पुष्पा ३' साठी काय नियोजित आहे, परंतु मला खरोखर त्याचा भाग होण्याची आशा आहे. माझे पात्र त्यात असेल का, असे विचारणारे बरेच चाहते मला मेसेज पाठवत असतात. मला आशा आहे की दिग्दर्शक काहीही निर्णय घेतील, पण हा एक अप्रतिम प्रवास असेल.

या कारणामुळे निराश झालेली आंचल आंचलने 'पुष्पा २' मध्ये काम करण्याचा तिचा अनुभव देखील सांगितला. ती म्हणाली की, आम्ही तीन सीन शूट केले होते, परंतु त्यातील दोन सीन कट करण्यात आले. जेव्हा मी हा चित्रपट पाहिला तेव्हा मला वाटले की, देवा, माझा डायलॉग कट झाला आहे. आता मला माहित नाही लोक कसे प्रतिक्रिया देतील? पण मला मिळालेले प्रेम आणि कौतुक खरोखरच संस्मरणीय आहे. ती पुढे म्हणाली की, माझे लक्ष नेहमीच दृश्याच्या प्रभावावर असते आणि मला विश्वास आहे की हा सीन कथेला एक महत्त्वाचे वळण देतो. 'पुष्पा २' चा भाग असल्याचा मला अभिमान आहे. मला फक्त या चित्रपटाचा एक भाग व्हायचे होते आणि मी ते साध्य केले.

'पुष्पा २' मधून आंचलचे टॉलिवूड पदार्पण'वी आर फॅमिली', 'स्ये', 'धूम मचाओ धूम' आणि 'बडे अच्छे लगते हैं' यासारख्या हिट टीव्ही शोसाठी ओळखल्या जाणाऱ्या आंचल मुंजालने सुकुमारच्या 'पुष्पा-द रुल'मधून टॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तिची छोटीशी भूमिकाही खूप आवडली होती, तिने १८ वर्षांपूर्वी तिच्या करिअरला सुरुवात केली होती आणि तिला 'पुष्पा २' मधून मोठा प्लॅटफॉर्म मिळाला होता. 

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुन