Join us
Daily Top 2Weekly Top 5

दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 13:35 IST

Thalapathy Vijay: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजय यांना चाहते थलापती का म्हणतात? हे तुम्हाला माहिती आहे का?

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजय आणि त्यांच्या 'तमिळगा वेत्री काझम' म्हणजेच टीव्हीके या पक्षाने तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवले. निवडणुकीच्या निकालांचे कल पाहता, विजय यांचा पक्ष सध्या मोठ्या फरकाने आघाडीवर असून, विजय हे तमिळनाडूचे पुढील मुख्यमंत्री होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, विजय यांना त्यांचे चाहते 'थलापती' का म्हणतात? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

अभिनेता विजयचे पूर्ण नाव 'जोसेफ विजय' असे आहे. तरीही चाहते त्याला थलापती विजय म्हणूनच ओळखतात. दक्षिण भारतात रजनीकांत यांना 'थलैवा' आणि कमल हासन यांना 'उलगनायगन' असे म्हटले जाते, त्याचप्रमाणे विजय यांनाही 'थलापती' ही उपाधी देण्यात आली आहे. मात्र, ही ओळख त्यांना एका रात्रीत मिळालेली नाही.

विजयने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात १९८४ मध्ये एक बालकलाकार म्हणून केली. त्यानंतरच्या काळात, त्याने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. विजय यांनी १९९२ मध्ये 'नालैया थीरपू' चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले. १९९४ मध्ये त्यांच्या 'रसिकन' या चित्रपटाच्या यशानंतर त्यांना 'इलयथलपती' ही उपाधी देण्यात आली. अनेक वर्षे ते याच नावाने ओळखले जात होते. मात्र, २०१७ मध्ये दिग्दर्शक ॲटली यांच्या 'मर्सल' चित्रपटावेळी ही उपाधी बदलून फक्त 'थलापती' अशी करण्यात आली.

गेल्या ३० वर्षांपासून तमिळ चित्रपटसृष्टी गाजवणारे थलापती हे बॉक्स ऑफिसचे सम्राट मानले जातात. त्यांनी ॲटली यांच्यासोबत केलेले तिन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. विशेषतः 'थेरी' चित्रपट प्रचंड गाजला, ज्याचा रिमेक आता हिंदीत 'बेबी जॉन' नावाने येत आहे.राजकारणात यश मिळत असतानाच, विजय यांचा आगामी चित्रपट 'जन नायकन' गेल्या पाच महिन्यांपासून सेन्सॉर बोर्डाच्या कायदेशीर कचाट्यात अडकला आहे. या कायदेशीर लढाईत विजय यांना यश मिळाल्यास, चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Why South Superstar Vijay is Called 'Thalapathy': A 32-Year-Old Story

Web Summary : Vijay, now a political force in Tamil Nadu, is known as 'Thalapathy.' The title evolved from 'Ilayathalapathy' after his 1994 hit 'Rasigan.' His successful film career, including collaborations with director Atlee, solidified his superstar status. His film 'Jan Nayakan' awaits release.
टॅग्स :थलापती विजयTollywood