Suraj Chavan Wedding: बिग बॉस मराठी ५चा विजेता आणि रीलस्टार सूरज चव्हाण नुकतंच लग्नाच्या बेडीत अडकला आहे. सूरज आणि संजनाचा विवाहसोहळा शनिवारी(२९ नोव्हेंबर) मोठ्या थाटामाटात पार पडला. सूरजच्या लग्नाला चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. संजनासोबत सप्तपदी घेत सूरजने त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. आधी साखरपुडा, मग हळद आणि मग पारंपरिक पद्धतीने लग्न असा विवाहसोहळा पार पडला. सूरजच्या लग्नाला जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार, पुरुषोत्तम पाटील आणि अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने हजेरी लावली होती. मात्र सूरजच्या लग्नात अंकिता वालावलकर गैरहजर होती.
सूरजचं केळवण करण्यापासून ते त्याच्या लग्नाच्या शॉपिंगपर्यंत सगळीकडे कोकण हार्टेड गर्ल त्याच्या सोबत होती. मात्र सूरजच्या लग्नात अंकिता कुठेच दिसली नाही. त्यामुळे सूरजच्या लग्नात अंकिता का आली नव्हती? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. याचं कारण समोर आलं आहे. ज्या दिवशी सूरजचं लग्न होतं. त्याच दिवशी अंकिताच्या जवळच्या मैत्रिणीचंही लग्न होतं. त्यामुळे अंकिता तिचा पती कुणालसोबत तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली होती. त्यामुळे तिला सूरजच्या लग्नात सहभागी होता आलं नाही. असं असलं तरी अंकिताने सूरज आणि संजनाला त्यांच्या नव्या आयुष्यासाठी सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
अंकिताने सूरज आणि संजनासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. "प्रिय सूरज आणि संजना, आज तुम्ही एकत्र हातात हात घालून नव्या वाटेवर पाऊल ठेवत आहात. या वाटेवर कधी उजेड असेल, कधी अंधार, कधी सावल्या, पण एकमेकांचा आधार, माया आणि एकमेकांची सोबत असेल तर प्रत्येक अडचण सहज पार करता येते. जीवनात कितीही बदल झाले तरी एकमेकांसाठीचा आदर, आपुलकी आणि जिव्हाळा कायम ठेवा. छोट्या छोट्या क्षणांत आनंद शोधा, एकमेकांच्या हसण्यात जग जिंका आणि एकमेकांच्या डोळ्यांतील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. नांदा सौख्य भरे... तुमच्या नवविवाहित जीवनाला मन:पूर्वक, हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा", असं अंकिताने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Web Summary : Ankita Valavalakar missed Suraj Chavan's wedding due to her close friend's wedding. Despite her absence, she conveyed heartfelt wishes to the couple via social media, ensuring her support and love.
Web Summary : अंकिता वालावलकर अपनी करीबी दोस्त की शादी के कारण सूरज चव्हाण की शादी में शामिल नहीं हो पाईं। अनुपस्थिति के बावजूद, उन्होंने सोशल मीडिया के माध्यम से जोड़े को हार्दिक शुभकामनाएं दीं और अपना समर्थन व्यक्त किया।