Join us
Daily Top 2Weekly Top 5

"लग्न झालेल्या पुरुषांच्या नादी लागायचं नाही", असं का म्हणाल्या वर्षा उसगांवकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 20:56 IST

Varsha Usgaonkar : वर्षा उसगांवकर यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी करिअर, इंडस्ट्रीतील किस्से अशा बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. यावेळी त्यांनी एकेकाळी लग्न झालेल्या पुरुषांच्या नादी लागायचं नाही असे ठरवले होते. यामागचं कारणही त्यांनी सांगितलं.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar). उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर वर्षा उसगांवकर यांनी चाहत्यांच्या मनावर अक्षरश: राज्य केलं. विशेष म्हणजे आजही त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. मराठी, हिंदी आणि राजस्थानी सिनेमांमध्ये काम केलेल्या वर्षा यांनी त्यांचा मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला आहे. त्यामुळे त्या सातत्याने चर्चेत येत असतात. नुकतेच त्यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये हजेरी लावली. त्यावेळी तिने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे.

वर्षा उसगांवकर यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी करिअर, इंडस्ट्रीतील किस्से अशा बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. यावेळी त्यांनी एकेकाळी लग्न झालेल्या पुरुषांच्या नादी लागायचं नाही असे ठरवले होते. यामागचं कारणही त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या की, माझे लव्ह मॅरिज नाहीये, माझे अरेंज मॅरेज झाले आहे. माझ्या दोन्ही बहिणी माझ्यापेक्षा लहान आहेत. त्यात मी अभिनेत्री म्हणून कार्यरत होते. त्यामुळे आई बाबांसमोर धर्मसंकंट होतं की, हिच्याआधी ह्यांचं लग्न करायचं की नाही. कारण मला लवकर लग्न करायचं नव्हतं. मी त्यांना म्हटलं होतं की, तुम्ही बिनधास्त त्यांचं लग्न करा. माझी काहीही हरकत नाही. मग दोघींची लग्न झाली. तिसरीचं लव्ह मॅरिज आणि दुसरीचं अरेंज मॅरिज आहे. मी स्वतःहून त्यांना माझ्याआधी त्यांचं लग्न लावायला सांगितलं होतं. त्यामुळे त्यांना फार बरे वाटले.

तनुजा म्हणाल्या - लग्न कर ना वर्षा उसगांवकर पुढे म्हणाल्या की, त्या दोघींची लग्न झाल्यानंतर ते दोघं म्हणायला लागले की, आता तू लग्न कर. आम्ही किती दिवस पुरणार हे टिपिकल डायलॉग बोलायचे. तेव्हा हे वाक्य घीसेपेटे आहे.  मला ते पटले. मी त्यांना माझ्यासाठी मुलगा शोधायला सांगितला. एकदा अभिनेत्री तनुजा माझ्यासोबत चेन्नईत शूटिंग करत होत्या. माझ्या आई आणि त्या गप्पा मारत होत्या. काजोल त्यावेळी बाजीगरमध्ये काम करत होती. त्यावेळी मला त्या लग्न कर ना. तेव्हा मी म्हटलं की, माझं लव्ह मॅरिज होणार आहे. त्या म्हणाल्या की, का, अरेंज का नाही. त्यावर मी त्यांना म्हणाली की,माझी आई माझ्यासाठी का नवरा शोधेल. माझा नवरा मलाच शोधावा लागेल. मग तनुजा म्हणाल्या की, असं काही नाही. अरेंज मॅरिजसुद्धा चांगलं असतं. आणि तसंच झालं. खरं सांगू का मी ज्या हिरोंसोबत काम केले ना, त्या सर्वांची लग्न झालेली होती. माझ्या आईने निक्षून सांगितलं होतं की, मला लग्न झालेला जावई नको. तेवढी कृपा कर. हे माझ्या मनावर चांगलं बिंबलेलं होतं की, लग्न झालेला नवरा नको. लग्न झालेल्या पुरूषाच्या नादी लागायचं नाही.  

टॅग्स :वर्षा उसगांवकर